क्राईम

अंगावर वीज पडल्याने महिला जागीच ठार

रावेर तालुक्यातील सुलवाडी येथे एका ३२ वर्षीय महिलेवर वीज पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली . आशाबाई राजेंद्र महानुभाव असे महिलेचे नाव आहे . त्या शेतात कामासाठी स्वतःच्या शेत गट क्रमांक १२९ मध्ये काम करत असताना सकाळी १० ते १२ वाजेच्या दरम्यान अचानक वादळीवाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली . पावसापासून बचाव करिता सदर महिला ही लिंबाच्या झाडाखाली गेली असता तिच्या अंगावर वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला . घटनेची माहिती निंभोरा पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोहचली व पोलिसांनी पंचनामा केलेला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रावेर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे . या प्रकरणी निंभोरा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे . पुढील तपास निंभोरा पोलीस स्टेशनचे सपोनि महेश जानकर यांचे मार्गदर्शनाखाली बापू पाटील करीत आहे.

Show More

Related Articles

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.