अंजाळे घाटात भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

यावल – आज यावल तालुक्यातील अंजाळे घाटात ट्रॅक्टर व दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यु झालेला आहे. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भालशिव ता.यावल येथील रहिवासी प्रदीप चावदस तायडे (वय-29) हे दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास भुसावळकडून भालशिव ता.यावल या आपल्या गावी दुचाकी क्रमांक एमएच -19 डीएम- 9429 ने जात असतांना भुसावळ रोडवरील अंजाळे घाटात समोर येणाऱ्या ट्रॅक्टर क्रमांक एमएच -19 पी-2953 वरील चालक ज्ञानेश्वर शिवराम कोळी रा.चोरवड ता.रावेर याचे आपल्या ताब्यातील भरधाव ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीवर येणाऱ्या प्रदीप चावदस तायडे यास ट्रॅक्टरखाली चेंगरल्याने त्याचा गंभीर जखमी होऊन जावून जागीच मृत्यु झालेला आहे. याबाबत शांताराम चावदस तायडे रा.भालशिव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टॕक्ट्रर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झालेला असुन पुढील तपास पोलीस निरिक्षक वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक अजमल पठान हे करीत आहे.