जळगावमहाराष्ट्रमुंबईराजकीय
Trending

जळगावात भाजपाच्या नुतन कार्यालयात लोकसभेच्या उमेदवारांबाबत खलबतं

विद्यमान खासदारांमध्ये धाकधूक वाढली

जळगाव दि-5 मार्च, आज जळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भारतीय जनता पक्षाच्या जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभा क्षेत्राच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,चंद्रशेखर बावनकुळे केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार , रावेरच्या खासदार रक्षा खडसे आणि जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील, जळगावचे आमदार सुरेश भोळे, भुसावळचे आमदार संजय सावकारे, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह मोजकेच महत्वपूर्ण पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, या कार्यालयाचे उद्घाटन नियोजित कार्यक्रमात समाविष्ट नसतानाही ऐनवेळी त्याचे उद्घाटन ठेवल्यामुळे भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह पोलीस प्रशासनाची प्रचंड ताळांबळ उडालेली दिसून आली.
दरम्यान, जवळपास 25 मिनिटे झालेल्या या चर्चेत जळगाव, रावेर ,धुळे ,नंदुरबार लोकसभा मतदार संघातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि लोकसभेसाठी इच्छुक उमेदवारांची माहिती याप्रसंगी गृहमंत्री अमित शहा यांना देण्यात आली. या गुप्त बैठकीत झालेली चर्चा समोर आलेली असून पुढील दोन दिवसात उत्तर महाराष्ट्रातील चारही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येतील.अशी माहिती समोर आली आहे. मात्र चार पैकी दोन विद्यमान खासदारांचा पत्ता कट होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे.

Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button