जिल्हाधिकारी आदेश

अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धेत सहभागासाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव, (जिमाका) दि. 28 – केंद्रिय सिव्हील सेवा सांस्कृतिक आणि क्रीडा नियंत्रण मंडळ, नवी दिल्ली यांच्यावतीने विविध खेळ प्रकारातील अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धा दरवर्षी आयोजित केल्या जातात. केंद्रिय क्रीडा नियंत्रण मंडळाच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली या स्पर्धा निरनिराळया राज्य शासनाच्यावतीने त्या त्या राज्यामध्ये आयोजित केल्या जातात.
            या स्पर्धासाठी विविध खेळ प्रकारातील महाराष्ट्र शासनाचा संघ निवड चाचणी घेवून स्पर्धांसाठी पाठविलर जातो. राज्य शासनाकडून या स्पर्धांसाठी महाराष्ट्र शासनाचा विविध खेळ प्रकारातील संघ निवडण्याची व त्याच्या प्रशिक्षण शिबिराची जबाबदारी सचिवालय जिमखान्यावर सोपविलेली आहे.
            तरी जळगाव जिल्ह्यातील ज्या शासकीय खेळाडू कर्मचाऱ्यांना टेबल टेनिस, बॅडमिन्टन, फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, व्हॉलीबॉल, जलतरण, बास्केटबॉल, ब्रिज, कॅरम, बुध्दिबळ, ॲथलेटिक्स, लघुनाट्य, कबड्डी, वेटलिफ्टींग, पावर लिफ्टींग, शरीरसौष्टव, कुस्ती, लॉन टेनिस, नृत्य व संगीत इत्यादी खेळ प्रकारात अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धात भाग घ्यावयाचा असेल त्यांनी विहित नमुन्यातील आवेदन पत्र जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव यांच्याकडून विहित मुदतीत प्राप्त करुन घ्यावेत.
            प्रत्येक खेळ प्रकारासाठी वेगळे आवेदनपत्र भरुन ते कार्यालय प्रमुख/ विभागप्रमुख यांच्या मान्यतेने एक आगाऊ प्रतिसह व्यवस्थापक, सचिवालय जिमखाना, 6, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, मुंबई यांच्याकडे 31 नोव्हेंबर, 2021 पर्यंत टपालाव्दारे किंवा व्यक्तीश: तसेच [email protected]  या ईमेलवर पाठवावीत. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.