अखेर “सीडी”बाहेर आली, ललवाणींनी जिल्ह्याच्या राजकारणात उडवली खळबळ
जामनेर – जिल्ह्याच्या राजकारणात गाजत असलेली बहुचर्चीत “सीडी” अखेर बाहेर काढण्यात आलेली आहे.जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी आज पत्रकार परिषद घेत कथीत गौप्यस्फोट केलेला असून आ.गिरीष महाजन यांचेवर बीएचआर प्रकरणी आणि जामनेर नगरपरिषदेतील गैरव्यवहार , शैक्षणिक संस्थांच्या जमीनी तसेच इतर भूखंडांविषयी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत.तसेच आ.गिरीश महाजन यांनी गेल्या काही वर्षांपासून जामनेर तालुक्यात सत्तेचा दुरूपयोग करत दडपशाही करून त्यांच्यावर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप पारस ललवाणी यांनी केल्याने खळबळ उडालेली आहे. बीएचआर सोसायटीच्या लिलावात विक्री केलेल्या मालमत्ता या गिरीष महाजन यांचे नातेवाईक आणि जवळच्या कार्यकर्त्यांनी खरेदी केल्याचा आरोप केलेला आहे. तसेच यातील काही मालमत्ता जामनेर शहरातील असून कोट्यवधी रुपये किंमत असलेल्या मालमत्ता आ. गिरीश महाजन यांनी अगदी काही लाखांमध्ये खरेदी केल्याचा आरोप ललवाणी यांनी आज केलेला आहे. तसेच ललवाणी यांनी त्यांच्याकडे काही “संबंधित” व्यक्तींच्या गैरव्यवहाराची “सीडी” व पेनड्राईव्ह असल्याचे भर पत्रकार परिषदेत दाखवत खळबळ उडवून दिलेली आहे. या सीडीत नेमके काय गुपीत आहे हे ललवाणी सांगितलेले नसून ते आपण योग्य वेळी बाहेर काढणार असल्याचे सांगितल्याने जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा या कथीत “सीडी” मुळे खळबळ उडालेली आहे. आता आणखी कोण-कोण अशा “सीडी” बाहेर काढणार आणि “लावरे तो व्हिडिओ” असे कोण बोलणार याची जनतेला उत्सुकता लागलेली आहे.