क्राईम

अज्ञात वाहनाच्या धडकेत हरीणाचा मृत्यू ,वेळीच उपचार न मिळाल्याचा वन्यप्रेमींचा आरोप

जळगाव दि- 07
यावल तालुक्यातील वाघळूद परिसरात एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एका हरिणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झालेला आहे. याबाबत यावल मनसेचे पदाधिकारी यांनी हरिणाला वेळीच उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप केलेला आहे. या पदाधिकाऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना या बाबत जाब विचारल्याने त्यांच्यात बाचाबाची होऊन एकच गोंधळ उडालेला होता. वाघळूद हा तापी नदीकाठचा वनपरिसर असल्याने या परीसरात सातत्याने वन्यजीवांचा वावर असतो. या परिसरात अनेकदा छोट्या वन्य जीवांच्या अपघाताच्या घटना घडतात मात्र अशा वन्य प्राण्यांना ताबडतोब उपचार मिळणे कठिण असते,तरी या वन्यजीवांचा अशा अपघाती मृत्यू रोखण्यासाठी यावल वनविभागाने योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी वन्यप्रेमींमधून केली जात आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.