आरोग्य

अत्याधुनिक अॕम्ब्युलन्समुळे भुसावळ परिसरातील रूग्णांना लाभ होईल- देवेंद्र फडणवीस भाजप नेते

भुसावळ – आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर असलेले राज्याचे भाजपचे नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सायंकाळी 5 वाजेला येथील ट्रामा केअर सेंटर व ग्रामीण रूग्णालय येथे आगमन झाले. या ग्रामीण रूग्णालयासाठी आमदार संजयभाऊ सावकारे यांच्या निधीतून अत्याधुनिक काॕर्डियाक रूग्णवाहिकेचे विपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झाले.यावेळी खा.रक्षाताई खडसे ,आ.संजयभाऊ सावकारे,आ.गिरीषभाऊ महाजन, जिल्हा शल्य चिकित्सक डाॕ एन.एस.चव्हाण, येथील वैद्यकीय अधिक्षक डाॕ मयुर चौधरी,भाजपचे वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डाॕ नि.तु.पाटील व भुसावळ शहरातील भाजपचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

ट्रामा सेंटर व ग्रामीण रूग्णालयामुळे भुसावळ परिसरातील नागरिकांना लाभ होईल- देवेंद्र फडणवीस विपक्ष नेते
भुसावळ येथील ट्रामा सेंटर व ग्रामीण रूग्णालयामुळे भुसावळ परिसरातील नागरिकांना याचा नक्कीच लाभ होईल. तसेच आता स्थानिक आमदार संजयभाऊ सावकारे यांच्या स्थानिक विकास निधीतून या रूग्णालयाला लागणारी वैद्यकिय संसाधने व इतर वैद्यकीय सुविधा नेहमीच पुरवत असतात. तसेच आमदार सावकारे यांनी या रूग्णालयाला आता अत्याधुनिक काॕर्डियाक रूग्णवाहिका उपलब्ध करून दिल्यामुळे येथील सेवेत वाढ होऊन परिसरातील रूग्णांना याचा नक्कीच लाभ होईल,असे प्रतिपादन विपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.