क्राईम
अनिल चौधरींवरील फसवणूकीचे आरोप खोटे ॲड- राजेश शर्मा
भुसावळ- आज भुसावळ येथे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्या तर्फे त्यांचे वकील राजेश शर्मा,ॲड.योगेश एस दलाल,ॲड.खालीद ए शेख यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत अनिल चौधरी यांच्यावरील रक्कम 60लाख 70 हजार रूपयांच्या गाळा खरेदी प्रकरणात असलेले फसवणूकीचे आरोप फेटाळून लावलेले आहेत. त्यांनी अनिल चौधरींना यांना या प्रकरणात फसविले जात असून आमचा न्यायपालिका व पोलिस प्रशासन यांच्यावर पूर्ण विश्वास असून अनिल चौधरी हे निर्दोष असल्याचे म्हटलेले आहे.