राज्य-देश

अपघात कमी करण्यासाठी रस्ते विकासाच्या सर्व टप्प्यावर “सेफ्टी ऑडिट” अनिवार्य- नितीन गडकरी केंद्रीय मंत्री  

नवीदिल्ली दि-6 अपघातांचे प्रमाण कमी करून लोकांचे जीव वाचविण्यासाठी, रस्ते विकासाच्या सर्व टप्प्यावर सेफ्टी ऑडिट करणे अनिवार्य करण्यात येणार आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग तसेच सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग नितीन गडकरी यांनी जाहीर केले.  ‘वेहीकल क्रॅश सेफ्टी’ या विषयावर द्रुकश्राव्य माध्यमाद्वारे झालेल्या चर्चासत्राचे उद्घाटन करताना ते बोलत होते. भारत आणि इतर विकसनशील देशांमध्ये रस्ते अपघातांचे प्रमाण अधिक प्रमाणात आहे आणि दरवर्षी सुमारे 1.5 लाख लोक मृत्यूमुखी पडतात, ज्याचे प्रमाण  कोविड मृत्यूंपेक्षा अधिक आहे, असे ते म्हणाले. गडकरी म्हणाले, की जवळपास 60% मृत्यू दुचाकीस्वारांचे असतात. मोटारसायकल वाहतुकीचे संरक्षण आणि सुरक्षितता ही काळाची गरज आहे, असे ते म्हणाले.  चालकांना प्रशिक्षण देणे आणि प्रगत प्रशिक्षण संस्था व केंद्रे स्थापन करणे यावरही मंत्री यांनी भर दिला.
चांगले रस्ते बनविणे आणि रस्त्यांची पायाभूत सुविधा सुधारणे ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले. जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि आपले उद्दीष्ट साध्य करण्यासाठी सर्व सहभागी घटकांमधील सहकार्य, संवाद आणि समन्वय आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.