राजकीय

अपात्रतेच्या भीतीमुळेच “त्या” नगरसेवकांचा सेना प्रवेश- एकनाथराव खडसे

मुक्ताईनगर – येथील नगरपंचायतीतील शिवसेनेत प्रवेश केलेल्या भाजपच्या नगरसेवकांना अपात्रतेची व गैरव्यवहार प्रकरणी कारवाईची भीती सतावत असल्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असे वक्तव्य माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे आज माध्यमांशी बोलताना सांगितले. यातील एका नगरसेवकाला चार मुले, दोघांचे अतिक्रमण तर एका नगरसेवकाच्या जातीच्या दाखल्याच्या अडचणी आहेत. त्यांना अपात्रतेची भीती सतावत असून जिल्हाधिकाऱ्यांकडे 1 जून रोजी या प्रकरणातील सुनावणी होणार आहे. त्याचप्रमाणे नगराध्यक्ष तडवी यांना वारंवार त्रास देणे व गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशामुळे आपल्यावर कोणताही परिणाम होणार नसून, नगराध्यक्ष व आठ नगरसेवक असे एकूण नऊ नगरसेवक माझ्यासोबतच आहेत,असा दावा माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी केलेला आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.