आंतरराष्ट्रीय

अफगणिस्तानात “तालिबान रिटर्न”,भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांना देशात आणले

नवीदिल्ली (वृत्तसंस्था)- अफगाणिस्तानमध्ये आता तालिबानने पुन्हा एकदा आपले वर्चस्व वाढवलेल असून ते कंदहारमधील भारतीय दूतावासाला लक्ष्य करू शकतात अशी शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केलेली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी अफगाणिस्तानमधून आपलं सैन्य माघारी घ्यायला सुरुवात केलेली आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे जगाला वाटत असलेली चिंता आता खरी होताना दिसत आहे. 
अफगाणिस्तानमध्ये तालिबानने पुन्हा एकदा डोके वर काढलेल असून त्यांनी मोठ्या भूभागावर वर्चस्व मिळवल्याचे स्पष्ट झालेल आहे. अफगाणिस्तानमधील परिस्थिती बिघडली असताना भारताने आपल्या दूतावासातील अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना मायदेशात विशेष विमानाच्या माध्यमातून परत आणण्यात आलेले आहे. कंदहार दूतावास तिथल्या स्थानिक कर्मचाऱ्यांच्या मदतीने अद्याप सुरु असल्याचं परराष्ट्र खात्याच्या वतीने आज स्पष्ट करण्यात आलेलं आहे.
भारताने आपले कंदहारमधील दूतावास बंद केल्याच्या बातम्या विदेशी माध्यमांतून प्रसिद्ध होत होत्या. त्यावर आता परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते असलेल्या अरिंदम बागची यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, “भारत अफगाणिस्तानमधील परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करत आहे. कंदहार दूतावासात काम करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असणार आहे. कंदाहारमधील भारतीय दूतावास अद्याप सुरु आहे. अफगाणिस्तानमधील परिस्थिती लक्षात घेता भारतीय कर्मचाऱ्यांना देशात परत आणलं आहे. परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत तात्पुरती ही उपाययोजना करण्यात आली आहे. कंदहार मधील दूतावास तिथल्या स्थानिक कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुरुच राहणार आहे.”
भारतावर होणार दूरगामी परीणाम
एकीकडे अमेरीका अफगणिस्तानातील आपले सैन्य माघारी घेत असतानाच दुसरीकडे अफगणिस्तानातील मोठ्या शहरांसह 80% भूभागावर तालिबान्यांनी पुन्हा एकदा कब्जा केलेला आहे. यामुळे अफगणिस्तानच्या मूलभूत सुविधा,भौगोलिक व शाश्वत विकासासाठी अब्जावधी डाॕलर खर्च करून नेहमी अग्रेसर असणाऱ्या भारताला ही कामे आता बंद करावी लागणार असल्याची स्थिती निर्माण झालेली आहे. तसेच येथील व्यापारावर सुद्धा आता परिणाम होणार आहे. आता अफगणिस्तानची वाटचाल आता पुन्हा तालिबानशाहीकडे सुरू झाल्याचे चित्र निर्माण झालेले आहे.तसेच भारतीय उपखंडात सामरीकदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या अफगणिस्तानात तालिबान, अल-कायदा आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयह पुरस्कृत दहशतवादी संघटनांचे वर्चस्व निर्माण होणार आहे. त्यामुळे अफगणिस्तान दहशतवाद्यांसाठी पुन्हा एकदा नंदनवन ठरण्याची शक्यता आहे. यातून भारतविरोधी कटकारस्थाने रचली जाऊ शकतात. तसेच अफगणिस्तानला सीमा लागून असलेला चीनदेखील भविष्यात या संघटनांना भारतविरोधी कारवायांसाठी शस्त्रांसांसह निधीचे खतपाणी घालू शकतो. अशी शक्यता गुप्तचर यंत्रणांकडून व्यक्त करण्यात आलेली आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.