आंतरराष्ट्रीय

अफगाणिस्तानात मोठा भूकंप 280 जण ठार,तर 1200 पेक्षा अधिक जण जखमी

अफगाणिस्तानात मोठा भूकंप 280 जण ठार,तर 1200 पेक्षा अधिक जण जखमी

काबुल (वृत्तसंस्था) :- भारताचा मित्रदेश असलेल्या अफगाणिस्तानमध्ये भूकंपामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे.आज पहाटेच्या भूकंपात 255 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. भूकंपाचे हे धक्के शेजारील पाकिस्तानातही जाणवल्याची माहिती पाकिस्तानी मिडीयानं दिलेली आहे.या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर तब्बल 6.1 इतकी नोंदविण्यात आलेली आहे. यूएस जिऑलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानच्या आग्नेय दिशेने डोंगराळ भागात होता.
दरम्यान, आंतरराष्ट्रिय वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे अफगाणिस्तानमध्ये आतापर्यंत 280 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, सुमारे 1200 लोक जखमी झालेले आहेत. पक्तिका आणि खोस्त प्रांतात हा भूकंप झाला.भूकंपाची कमाल तीव्रता अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. तथापि, रिश्टर स्केलवर 7.0 किंवा त्याहून अधिक तीव्रतेचा भूकंप मध्यम धोकादायक मानला जातो. अफगाणिस्तानातील भूकंप यापेक्षा कमी तीव्रतेचा होता.
पाकिस्तानमध्येही अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले
पाकिस्तानी मीडियाच्या रिपोर्टनुसार, राजधानी इस्लामाबादसह अफगानिस्तान सीमेला लागून असलेल्या प्रांतांमध्ये तसेच इतरही काही शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेले आहे. सोशल मीडियावरही लोक भूकंपाबद्दल बोलतांना दिसत आहेत. विविध सोशल मिडियावर लोकांनी लिहिलेलं आहे की, भूकंपाचे हे धक्के काही सेकंदांसाठी जाणवले. मात्र यामुळे गोंधळ उडून लोक घाबरून इकडे-तिकडे धावू लागले.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.