अमृत सरोवरामुळे पश्चिम विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त भागामध्ये जलसमृद्धी निर्माण होऊन येथील शेतकरी कृषीसमृद्ध आणि अर्थसंपन्न होईल- नितीन गडकरी

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून बांधल्या जाणाऱ्या अमृत सरोवरा मुळे पश्चिम विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त भागामध्ये जलसमृद्धी निर्माण होऊन येथील शेतकरी कृषीसमृद्ध आणि अर्थसंपन्न होईल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज अकोला येथे केले . डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ –पीकेव्ही तसेच महाराष्ट्र पशू विज्ञान आणि मत्स्य विद्यापीठ-माफ्सू परिसरात २० अमृत सरोवरांचे लोकार्पण हे गडकरी यांच्या हस्ते कृषी विद्यापीठाच्या परिसरातील के .आर . ठाकरे सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे, डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, माफ़्सूचे कुलगुरू डॉ . आशिष पातुरकर प्रामुख्याने उपस्थित होते.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे अकोला जिल्ह्यातील कृषी विद्यापीठ परिसरामध्ये 34 तलावांचे निर्माण होणार असून यातील 20 अमृत सरोवरांचे लोकार्पण आज होत आहे. या शेततळ्यातील खोलीकरणातून आलेली माती तसेच गाळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रस्ते बांधकामासाठी वापरण्यात येणार असून या माध्यमातून तयार होणाऱ्या शेततळ्याला भर उन्हाळ्यात पाणी आहे . या उपक्रमामुळे आज या प्रक्षेत्राच्या दहा ते बारा गावाच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून तेथील शेतकती आता लिंबाची शेती देखील करत आहे . या योजनांमुळे मोठमोठे तलाव-धरणे बांधण्याची गरज राहणार नाही. विदर्भ खऱ्या अर्थान सुजलाम् सुफलाम् होईल असे मत गडकरी यांनी यावेळी व्यक्त केलं.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी सांगितले की अकोला जिल्ह्यातील वनी रंभापुर आणि बाभूळगाव प्रक्षेत्रावर 30 मोठे शेततळे तयार करण्यात आले असून त्या माध्यमातून सुमारे 1,400 एकर जमीन ओलिताखाली येणार आहे . याप्रसंगी त्यांनी कृषी विद्यापीठाच्या विविध उपलब्धतेविषयी उपस्थितांना माहिती दिली
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी राजेश अग्रवाल यांनी केले . त्यांनी सांगितले की 2017 मध्ये महाराष्ट्र शासनाने एक शासन आदेश काढला होता ज्यामध्ये शेततळ्याच्या निर्माणाकरिता आणि राष्ट्रीय महामार्गाच्या निर्माण याकरिता राजस्व शुल्काशिवाय माती उपलब्ध करून देण्यात येईल . या उपक्रमामुळे पर्यावरणाचे संरक्षण झाले असून मृदा तसेच जलसंधारण सुद्धा झाले आहे . रस्त्याच्या बांधकामाचे टॉप सॉईलचा उपयोग होत असे, तो आता या उपक्रमामुळे न झाल्याने मृदा संवर्धन सुद्धा होत आहे. अकोला जिल्ह्यात 34 अमृत सरोवराचे निर्माण नियोजन असून त्यातील 20 अमृत सरोवराचे काम पूर्ण झाले असून या या कामातून 12.50 लाखघनमीटर माती काढण्यात आली आहे . या 34 अमृत सरोवराच्या माध्यमातून या क्षेत्रातील 2,468 हेक्टरवर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे तर 1,276 क्युबिक सेंटीमीटर पाणी साठाक्षमतेचे लक्ष आहे .