आरोग्य

आजचा दिवस भारतीयांसाठी खूप क्रांतिकारक -खासदार रक्षाताई खडसे

भुसावळ- शहरातील नगरपरीषदेच्या दवाखान्यात आज कोव्हिड लसीकरणास रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षाताई खडसे, भुसावळचे आमदार संजयभाऊ सावकारे यांच्या उपस्थितीत सुरूवात करण्यात आली. यावेळी नगरपालिकेतील कर्मचारी आणि आशा वर्कर यांना पहिल्यांदा कोव्हिड लस देण्यात आली. यावेळी बोलताना खासदार रक्षाताई खडसे म्हणाल्या की भारतातील शास्त्रज्ञ व प्रशासनाने खूप मेहनत घेतल्याने आज ही महत्त्वाची लस आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. आजचा दिवस हा देशवासियांसाठी खूप महत्त्वाचा आहे. पहिल्यांदा प्रशासनाच्या वतीने ही लस आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना दिली जात आहे. प्रशासनाच्या वतीने खूप काळजी आणि मेहनत घेऊन नियोजन करण्यात आलेले आहे, याचा फायदा सर्वसामान्य जनतेला होणार असल्याचे मत आज यावेळी बोलताना खासदार रक्षाताई खडसे यांनी व्यक्त केले आहे.

Show More

Related Articles

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.