महाराष्ट्रमुंबईराजकीयराष्ट्रीय
Trending

नितीन गडकरी तब्बल ‘इतक्या’ कोटींचे आहेत मालक,तसेच दोन D.Sc, चार D.litt, एक p.hd या पदव्याही चर्चेत

रस्ते व महामार्ग विकासात मोलाचं योगदान

मुंबई ,दिनांक- 28 मार्च , आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी देशभर चर्चेत असलेले नेते म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचं नाव घेतलं जातं. ते जे बोलतात ते केल्याशिवाय राहत नाही असा आजवरचा अनुभव आहे.
परवा नितीन गडकरी नागपूर मध्ये आपल्या नागपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. या अर्ज सोबत त्यांनी त्यांचे शिक्षण, उत्पन्न आणि स्थावर व जंगम मालमत्तेचा तपशील दिलेला आहे. तसेच त्यांच्यावर दाखल असलेल्या दहा गुन्ह्यांची माहिती देखील त्यांनी यात दिलेली आहे, यातील काही प्रकरणे न्यायालयात प्रविष्ट आहेत. गडकरींचे शिक्षण बीकॉम एलएलबी झालेले असून त्यांना त्यांच्या कार्याला बघून काही विद्यापीठांनी त्यांना एक पीएचडी ,चार डी.लीट (D.lit) यांच्यासोबत यातील सर्वात चर्चेचा मुद्दा आता समोर आलेला असून तो म्हणजे त्यांना दोन डी.एस्सी(doctor of science) या दुर्मिळ पदव्या मिळालेल्या आहेत. देशातील काही मोजक्याच राजकारणी नेत्यांकडे ही डीएस्सी ची पदवी आहे.त्यापैकी नितीन गडकरी हे एक आहे. वरील सातही मानद पदव्या त्यांना गेल्या पाच वर्षात त्यांनी रस्ते आणि महामार्ग विकासात केलेल्या विक्रमी आणि विशेष कार्याला अनुसरून देण्यात आलेल्या आहेत.
गडकरींची संपत्ती किती ?
नितीन गडकरी यांनी यावेळी सादर केलेल्या शपथपत्रांमध्ये ते आणि त्यांची पत्नी कांचन त्यांच्याकडे आज रोजी 15 कोटी 52 लाख रुपयांची एकूण संपत्ती आहे. गटकरी दाम्पत्यांचे एकूण वार्षिक उत्पन्न 54 लाख 46 हजार असून त्यांच्यावर विविध बँकांचे तब्बल 2 कोटी 4 लाखांचे कर्ज आज रोजी येणेबाकी आहे. त्यांच्याकडे एकूण सहा कार आहेत. ज्याची किंमत एकूण 46 लाख दाखवण्यात आलेली आहे.
सडकछाप राहण्याची मजा काही औरच असते
नितीन गडकरी यांना अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सायन्स (डीएससी) ही मानद पदवी प्रदान केली आहे. या विद्यापीठाच्या समारंभात व्यासपीठावर जाहीरपणे सांगितले होते की, आज पर्यंत मला सात वेळा वेगवेगळ्या डिलीट आणि डॉक्टरेट मिळालेल्या आहेत. मात्र कधीही डॉक्टर लावणार नाही, याचं कारण म्हणजे मी थर्ड क्लास सिनेमाच तिकीट घेऊन सिनेमा किंवा नाटक बघणारा आहे.मी फुटपाथवरचा नाश्ता करणारा व्यक्ती आहे.आणि असं सडक छाप राहण्यात जी मजा आहे ती कशातच नाही, असे रोखठोक मत त्यांनी व्यक्त केले होते. तसेच त्यांनी मी कोणताही विद्वान व्यक्ती नाही ,माझ्यात जे काही कौशल्य आहे. त्याचा मी पूर्णपणे सदासर्वदा देशसेवेसाठी कसा वापर करता येईल, यासाठी नेहमी प्रयत्न करत असतो. आणि आपण प्रत्येकाने सुद्धा तसा प्रयत्न केलाच पाहिजे, असे प्रेरक मत त्यांनी त्यावेळी केले व्यक्त होते. तेव्हा बोगस पीएचडी आणि डॉक्टरेट मिळविणाऱ्या आणि स्वतःला विद्वान समजणाऱ्या शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील नेत्यांना मोठी चपराक बसली होती.

Show More
Back to top button