शासन निर्णय

आज मुख्यमंत्र्यांची प्रमुख अधिकाऱ्यांसह महत्त्वाची बैठक, सायंकाळी जनतेला संबोधित करणार ?

मुंबई दि-2 सध्या मुंबई सह राज्यातील कोरोनाचा प्रचंड वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आज सायंकाळी 5 वाजेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ काॕन्फरन्स द्वारे महत्त्वाच्या मिटींगचे आयोजन केलेले आहे.
यात राज्यातील कोरोनाच्या दुसऱ्या संभाव्य लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या कडक निर्बंध आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर चर्चा करण्यात येणार आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध तर काही ठिकाणी लाॕकडाऊन लावण्यात आलेला आहे. तरीही रोजच्या वाढत्या रूग्णसंख्येवर नियंत्रण मिळविणे कठिण होऊन बसलेले आहे. याच पार्श्वभूमीवर ही महत्वपूर्ण बैठक होणार असून गर्दीची ठिकाणे असलेल्या बाजारपेठा, शाॕपींग माॕल्स, बसेस आणि लोकल रेल्वे प्रवासावर काही कडक निर्बंध लावले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या बैठकीत संपूर्ण राज्यात मिनी लाॕकडाऊन अथवा कडक निर्बंध लावण्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री सायंकाळी 7 वाजेला जनतेला संबोधित करून कडक निर्बंध लावण्यासंदर्भात घोषणा करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राज्यात 5 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा
राज्यात गेल्या वर्षभरापासून राज्यातील सर्व महाविद्यालये बंद असल्याने आणि काही एनजीओंचे रक्त संकलनाचे कार्य कमी झाल्याने राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला आहे. राज्यात पाच दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक असल्याने मुख्यमंत्री जनतेला रक्तदानाचे आवाहन करू शकतात.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.