महाराष्ट्रमुंबईराजकीय

राज्याची कलासंस्कृती दर्शविण्यासाठी ‘मुंबई फेस्टीव्हल २०२४’ मध्ये विविध कार्यक्रमांच्या आयोजनात सहभागी व्हा-पर्यटनमंत्री गिरीश महाजन

मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समितीमार्फत मुंबईमध्ये २० ते २८ जानेवारी दरम्यान ‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये मुंबई शहर आणि उपनगरात  विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. राज्याची कलासंस्कृती दर्शविण्यात या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.

            मुंबईतील पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध प्रसिद्धी माध्यमाद्वारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावर प्रसिद्धी मोहीम राबवून पर्यटकांना आकर्षित करण्यात येते. तसेच बॉलीवूड टूरीझम, मुंबईतील युनेस्को हेरिटेज स्थळे, दक्षिण मुंबईतील वास्तू कलेचा उत्कृष्ठ नमुना असलेल्या  इमारतींच्या प्रसिद्धीसाठी हेरिटेज वॉक, गेटवे ऑफ इंडिया येथे लाईट ॲण्ड साऊंड शो, उपनगरातील गोराई येथील विपश्यना सेंटर, कान्हेरी कॅव्हज्, गिलबर्ट हिल, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, जुहू चौपाटी इत्यादी पर्यटन स्थळांची व्यापक प्रसिद्धी करुन पर्यटकांना आकर्षित करण्यात येते. तसेच खाजगी सहल आयोजकांच्या माध्यमातून मुंबई दर्शन व बॉलीवूड टूर या सहलींचे देखील आयोजन करण्यात येते.

मुंबई फेस्टिवल हा जागतिक पातळीवर पोहोचावा याच्यासाठी कशाप्रकारे

 प्रसिद्धी करण्यात येत आहे

        मुंबई महोत्सवाच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावर व्यापक प्रसिद्धीसाठी  प्रयत्न करण्यात येत आहेत. महोत्सवाच्या प्रसिद्धीसाठी नामांकीत वृत्तपत्र समुह व दूरचित्रवाहिनी यांना मीडिया पार्टनर म्हणून देखील सहभागी करुन घेण्यात आले आहे.                                                              

            मुंबई मॅरेथॉन आणि ‘काळा घोडा कला महोत्सव’ यांचे आयोजक देखील या फेस्टिवलमध्ये सहभागी आहेत. मुंबईमध्ये नावाजलेल्या अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वांचा या महोत्सवामध्ये सहभाग असणे ही अभिमानाची गोष्ट आहे आपण काय सांगाल याबद्दल

            मुंबई मॅरेथॉन व काळा घोडा महोत्सव हे दोन कार्यक्रम मुंबईमधील नामांकित तसेच सर्वसामान्यांच्या आकर्षणाचे कार्यक्रम आहेत. या कार्यक्रमात अनेक नामांकित व्यक्ती सहभागी होत असतात. हे कार्यक्रम हे जानेवारी मध्येच आयोजित होत असल्यामुळे त्यांना या महोत्सवाचा एक भाग म्हणून सहभागी करुन घेण्यात आले आहे. त्यामुळे या महोत्सवाच्या माध्यमातून या कार्यक्रमांना देखील व्यापक प्रसिद्धी देऊन त्यामाध्यमातून स्थानिक तसेच पर्यटकांना त्याचा लाभ घेणे शक्य होईल. 

या फेस्टिव्हलमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे यासाठी काय आवाहन कराल.?

 या फेस्टिवलसाठी सर्वांना सहभागी होता येणार आहे का याच्यासाठी प्रवेश शुल्क आकारले आहे का ?

            या महोत्सवात सर्व मुंबईकर व पर्यटकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. https://mumbai-festival.com/ या संकेतस्थळावर जावून २० ते २८ जानेवारी दरम्यान होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमासाठी नाव नोंदणी करावी. तसेच सदर महोत्सवा दरम्यान शॉपिंग मॉल, रिटेलशॉप, नाईट मार्केट व मुंबई एक्स्पो इत्यादी ठिकाणी प्रवेश नि:शुल्क असेल. या महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी नोंदणी अनिवार्य करण्यात आली असून त्यासाठी माफक शुल्क आकारणी करण्याचे प्रस्तावित आहे. 

‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक २० जानेवारी रोजी सायंकाळी ६ ते १० वाजता  क्रॉस मैदान गार्डन येथे होणार आहे. तसेच एमएमआरडीए मैदान वांद्रे येथे महा एक्स्पोचे आयोजन केले असून दि.२० जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता ‘महा एक्सपो’चे उद्धघाटन होणार आहे. हा ‘महा एक्सपो’ दिनांक २८ जानेवारी २०२४ पर्यंत असणार आहे. सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत ‘महा एक्सपो’ सुरू असेल तर शनिवार आणि रविवारी दुपारी १ ते रात्री १० वाजेपर्यंत ‘महा एक्सपो’ सुरू असेल.

        मुंबईतील विविध ठिकाणी दिनांक १९ ते २१ जानेवारी आणि २६ आणि २८ जानेवारी  रोजी शॉपिंग फेस्टचे आयोजन केलेले आहे.काळा घोडा येथे दिनांक २० ते २८ जानेवारी रोजी कला महोत्सवाचे आयोजन केलेले आहे. बीच फेस्ट २० जानेवारी ते २८ जानेवारी दरम्यान असून यामध्ये योगा, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बीच क्लीन अप आणि स्क्रिनींग असे विविध उपक्रम जुहू चौपाटी येथे सायंकाळी ६ ते ७ या वेळेत आयोजित केले आहेत.

            सिनेमा फेस्ट दिनांक २० ते २४ जानेवारी दरम्यान असून सायंकाळी ७ वाजता पीव्हीआर चित्रपट गृहांमध्ये मुंबईत विविध शोंचे आयोजन केलेले आहे. टुरिजम कॉनक्लेव्ह २४ जानेवारी रोजी कलिना येथील ग्रॅण्ड हयात येथे आयोजित केले असून सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे टुरिजम कॉनक्लेव्ह सुरू असेल. क्रिकेट क्लिनीक दिनांक २० ते २१ जानेवारी आणि दिनांक २७ व २८ जानेवारी रोजी सकाळी ७ ते रात्री ९ आणि रात्री १० ते १२ वाजेपर्यंत ओव्हल मैदान येथे आयोजित केले आहे.

टाटा मुंबई मॅरेथॉनचे दिनांक २१ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजन केले आहे.टर्बो स्टार्ट फॉरईव्हर प्लॅनेट चॅलेंज दिनांक २५ जानेवारी रोजी बीएसई फोर्ट येथे सकाळी ९ ते दुपारी २ वाजता आयोजित केले आहे. पॅरामोटर शो दिनांक २७ जानेवारी रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत गिरगाव चौपाटी येथे आयोजित केला आहे. म्युझिक फेस्ट दिनांक १९ ते २८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता विविध ठिकाणी आयोजित केले आहे. संगीत महोत्सवाचे महालक्ष्मी रेसकोर्स येथे दिनांक २७ व २८ जानेवारी २०२४ रोजी आयोजन केले आहे. समारोप कार्यक्रम दिनांक २८ जानेवारी २०२४ रोजी संध्याकाळी ७ वाजता वांद्रे येथील एमएमआरडीए मैदान येथे आयोजित केला आहे.या महोत्सवात राज्याच्या कला संस्कृतीचे दर्शन घडवून आणण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सायकलींग टूर, वॉटर स्पोर्टस्, बीच ॲक्टीव्हीटीज्, पॅरामॉटर शो, जुहू चौपाटी येथे बीच फेस्टीव्हल याअंतर्गत फुटबॉल, व्हॉलीबॉल, योगा, बीच स्वच्छता मोहीम, मुव्हीज् स्क्रीन इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. प्रत्येक दिवशी विविध कार्यक्रम आहेत. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी  https://mumbai-festival.com/ या संकेतस्थळावर नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी नोंदणी अनिवार्य करण्यात आली  आहे

Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button