मंत्रीमंडळ निर्णयमुंबईराजकीय

आता ठाकरे सरकारचे ‘हे’ निर्णय देवेंद्र फडणवीसांच्या निशाण्यावर ? मेट्रो कारशेडचा निर्णय बदलणार,तर बुलेट ट्रेनला गती ?

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळातील काही निर्णय बदलण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं गुजरातमधील काम वेगात सुरु आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रातील कामाला गती मिळालेली नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आल्यानंतर फडणवीस यांनी मेट्रो कारशेड आरेमध्येच होईल हे स्पष्ट केलं आहे.


बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती मिळणार ?


‘मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन योजनेवर काम सुरू आहे. त्या अंतर्गत गुजरातमध्ये ९९.७ टक्के भूसंपादन झाले असून, ७५०हून अधिक पिलर उभारण्यात आले आहेत. गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्रातील बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाच्या कामाची गती कमी आहे. आता देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आल्यानंतर बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती दिली जाण्याची शक्यता आहे.


मेट्रो कारशेड आरेमध्येच होणार


देवेंद्र फडणवीस यांच सरकार असताना मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी आरेमधील जागा निश्चित करण्यात आलं होतं. उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर मुंबई मेट्रो ३ आणि मेट्रो ६ सह अन्य मेट्रोच्या मार्गिकांसाठी कांजूरमार्गची जागा निश्चित करण्यात आली. मात्र, केंद्र सरकार ती जागा आमची असल्याचा दावा केला. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो कारशेड आरे मध्ये होईल, असा युक्तिवाद न्यायालयात करा अशा सूचना महाधिवक्त्यांना दिल्या आहेत. आज उद्धव ठाकरेंनी मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका, असं म्हणत मेट्रो कारशेड कांजूरमार्गला ठेवा असं आवाहन केलं

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.