शासन निर्णय

आता “फि” देऊन जेलची “हवा” खाता येणार,जेल पर्यटनाला हिरवी झेंडी

मुंबई – येत्या 26 जानेवारीपासून प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जेल पर्यटनाला चालना देण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हिरवी झेंडी दाखवलेली आहे.या जेल पर्यटनाची सुरुवात पुण्यातील येरवडा या जगप्रसिद्ध कारागृहापासून सुरू होणार आहेत.या येरवडा कारागृहात हे तब्बल 500 एकर परिसरात पसरलेले असून सर्वात उच्च प्रतिचे स्थापत्य शैलीचे बांधकाम या कारागृहाचे करण्यात आलेले आहेत.या येरवडा कारागृहात देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरोधात लढणाऱ्या देशातील अनेक नामवंत महापुरूष ,स्वातंत्र्यसैनिक व स्वातंत्र्ययोद्धे यांना इंग्रजांनी तुरुंगात टाकलेले होते. या तुरूंगाचा एक वैभवशाली इतिहास असून राज्यात असे अनेक अवाढव्य आणि ऐतिहासिक कारागृह असून त्या सर्वच ठिकाणी हे जेल पर्यटन आता हळूहळू सुरू होणार आहे. कारागृह आतून कसे असते याची बालगोपालांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच कुतुहुलता असते ते प्रत्यक्षात” याची देही याची डोळा” सर्वांनाच पाहता यावे. व त्या बद्दलची सविस्तर माहिती ज्ञात व्हावी व पर्यटनाच्या माध्यमातून राज्याच्या तिजोरीत महसूलरूपी निधी जमा व्हावा हा या जेल पर्यटनामागील मुख्य उद्देश्य असल्याचे आज नांदेड येथे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केले आहे.त्यामुळे राज्यातील अनेकांना आता जेलची “हवा खाता” येणार आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.