आता विधानसभा अध्यक्षपदासाठी जोरदार हालचाली सुरू, तीन जणांची नावे चर्चेत

मुंबई: एकनाथ शिंदे यांनी काल मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे.त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,DCM देवेंद्र फडणवीस आणि मुख्य प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची मंत्रालयात काल रात्री बैठक पार पडली. या बैठकीला सर्व प्रमुख विभागांचे सचिव उपस्थित होते.या बैठकीमध्ये 3 व 4 जुलै रोजी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलविण्यात आलेले आहे.
हे पण वाचा –महाराष्ट्राचा “शॅडो मुख्यमंत्री” कोण होणार

विधानसभा अध्यक्षपदासाठी दोघांची चर्चा
(Speaker of assembly Maharashtra)
दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी नव्या सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करण्यासाठी हे विशेष अधिवेशन बोलविले आहे. यात 3 जुलै रोजी विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार असून नवीन अध्यक्षांची निवड होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे.विधानसभा अध्यक्ष पदासाठी भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या नावाची चर्चा भाजपच्या गोटात सुरू आहे अशी माहिती भाजपच्या सूत्रांनी दिलेली आहे.तर दुसरीकडे शिवसेनेच्या गोटात दीपक केसरकर यांच्या नावाची विधानसभा अध्यक्ष पदासाठी चर्चा सुरू आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष पदासाठी नेमकी कोणाची वळणी लागते याकडेही आता महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.