क्राईम
आदर्श शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ


किशोर पाटील कुंझरकर हे राज्यातील विविध शिक्षक संघटनांच्या राज्याध्यक्ष्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य महासचिव होते. तसेच सदरील कार्य सुरू ठेवण्याची मुभा त्यांना देण्यात आलेली होती. यासह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते. मात्र आज सकाळी त्यांचा मृतदेह पलासदळ जवळ आढळून आल्याने एकाच खळबळ उडाली आहे. किशोर पाटील यांच्या अंगावरील कपडे फाटलेले आढळून आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याशी कुणी हातापायी केली आहे का ? नेमके या ठिकाणी पाटील हे का आले होते ? याबद्दल पोलीस प्रशासन तपास करीत आहे.