Crimeपुणे

आधी तोतया पोलिसांची धाड, मग लगेच असली पोलिस दाखल, नगररचना उपसंचालकांचे 5 लाख लुटण्याचा प्रयत्न फसला

आधी तोतया पोलिसांची धाड, मग लगेच असली पोलिस दाखल, नगररचना उपसंचालकांचे 5 लाख लुटण्याचा प्रयत्न फसला

पुणे दि:25 आम्ही मुंबईतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (Anti Corruption Bureau Mumbai ) पोलीस अधिकारी असल्याचे सांगून पुण्यातील नगर रचना उपसंचालकाच्या घरात जबरदस्तीने शिरुन तोतया पोलिसांनी त्यांना लुबाडण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.मात्र, या घटनेची माहिती या परीसरात गस्तीवर असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकांना (PSI) मिळाली असता, त्यांनी तेथे जाऊन चौकशी करण्याच्या प्रयत्न केला. तेव्हा या तोतया पोलिसांनी त्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनाच आम्हाला कोणतीही कल्पना न देता तुम्ही इथे कसे आलात ? असे धमकावून वरिष्ठांशी मोबाईलवर बोलण्याचा बहाणा करुन त्यांनी परस्पर धूम ठोकली. पोलिसांनी वेळीच दाखल होत हस्तक्षेप केल्याने एका वरिष्ठ अधिकाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न फसलेला आहे.या तोतया पोलिसांनी टाकलेल्या धाडीची परीसरात जोरदार चर्चा सुरू आहे.
याप्रकरणी पुणे येथील नगर रचना विभागाचे उपसंचालकांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे.हा प्रकार कर्वेनगरमधील दत्त दिगंबर कॉलनीत शुक्रवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास घडलेला आहे. तक्रारदार यांनी सांगीतलेल्या वर्णनावरुन पोलिसांनी साध्या वेशातील सावंत व पोलीस गणवेशातील एक पुरुष व महिलेवर गुन्हा दाखल केलेला आहे.
याबाबत पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमलबजावणी संचालनालय (ED)आणी सीबीआय हे कोठेही धाड टाकायची असल्यास भल्या पहाटेच जातात. त्याप्रमाणे हे तोतया अधिकारी पोलीस सकाळी सात वाजता या उपसंचालकांच्या घरी गेले. प्रथम त्यांनी आम्ही मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आलेलो असल्याचे सांगितले.त्यांनी 23 जून रोजी तुमच्या कार्यालयात काय झाले होते ? याची विचारणा केली. त्यांनी त्यांच्याकडील एका व्हिडिओ दाखवून त्यामध्ये एक इसम झोन दाखल्याबाबत आला होता. त्याबाबत फिर्यादीने आरोपीना माहिती दिली. त्यावर या तोतया पोलिसाने तुमच्या कार्यालयातील एकाने झोन दाखल्यासाठी आलेल्याकडे पैशांची मागणी करुन काही रक्कम स्वीकारली व तो रंगेहाथ पकडला गेला आहे. तसेच त्याने तुमचे नाव देखील सांगितले आहे.जर तुम्हाला तुमचे नाव कमी करायचे असेल तर तुम्हाला आम्हाला आत्ताच पाच लाख रुपये द्यावे लागतील. अन्यथा आम्ही तुमची संपत्ती जप्त करू तसे आदेश आम्ही सोबत आणलेले आहेत.असे तोतया पोलिस अधिकाऱ्यांनी उपसंचालकांना धमकावले.हा सर्व प्रकार सुरू असताना याच वेळी त्यांचा मुलगा घराबाहेर पडून सोसायटीच्या बाहेर रस्त्यावर आला असता, त्याला रस्त्यात गस्तीवर असलेल्या वारजे पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक यांची गाडी जाताना दिसली. त्यांना थांबवत घरी सुरू असलेला सर्व प्रकार सांगितला व त्यांच्यासह घरी दाखल झाला. दाखल झाल्यानंतर महिला पोलीस निरीक्षक यांनी त्या तोतया पोलीसांना ओळखपत्राबाबत विचारले असता त्यांनी उलट या महिला उपनिरीक्षकाला रूबाब दाखवत त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली व तुमच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षकांचा आम्हाला मोबाईल नंबर द्या असे सांगीतले.या महिला पोलीस उपनिरीक्षक यांनी त्यांना निरीक्षकांचा मोबाईल नंबर दिला असता आम्ही तुमच्या वरीष्ठांशी आता लगेच बोलतो असे म्हणत रेंजची समस्या आहे.असे सांगत घराबाहेर जाऊन बोलणे सुरू केले व त्यातच त्यांनी नकळत बाहेर जाऊन धूम ठोकली.मात्र एका महिला पोलिस उपनिरीक्षकांमुळे एका अधिकाऱ्याला लुटण्याचा डाव थोडक्यांत उधळला गेला.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.