राजकीय
आमदारांच्या यादीत नाव आल्यानंतर एकनाथराव खडसे यांची प्रतिक्रिया
मुक्ताईनगर- विधानपरिषदेसाठी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेल्या प्रतिक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आभार मानलेले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील आमदारांची संख्या दोन झालेली आहे. यापूर्वी अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील हे जिल्ह्यात विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेले एकमेव आमदार आहेत.