Crime

आमदाराच्या खात्याच्या बनावट चेकवर हुबेहूब बनावट सही करून 78 लाखांचा गंडा घालण्याचा प्रयत्न फसला

मुंबई दि-16 मुंबईतील शिवडी विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांची चक्क बॅंकेच्या हुबेहूब बनावट चेकवर हुबेहूब बनावट सही करून तब्बल 78 लाखांचा गंडा घालण्याचा प्रयत्न बॅंकेच्या अधिकाऱ्यांच्या हुशारीने पूर्णतः फसला.यामुळे या बॅंकेत एकच खळबळ उडालेली असून चक्क आमदारांना 78 लाखांचा चुना लावण्याचा प्रयत्न फसल्याने चर्चांना उधाण आलय.
याबाबत सुदर्शन रमेशचंद्र दवे (वय 47) रा.अहमदाबाद ,गुजरात आणि जयेश चंद्रकांत शहा (वय 54) रा.कांदिवली मुंबई अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. परळ येथील रहिवासी असलेलले तक्रारदार शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांना आमदार म्हणून मिळणारे मासिक मानधन युनियन बँक ऑफ इंडियाच्या लालबाग शाखेत जमा होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबादमधील नारनपुरा शाखेतील बँक अधिकाऱ्यांना चौधरी यांची स्वाक्षरी असलेला धनादेश क्लिअरिंग साठी मिळालेला होता. त्याबाबत संशय आल्यानंतर अहमदाबाद येथील बँक कर्मचाऱ्यांनी लालबाग शाखेच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधला. त्यानंतर लालबाग शाखेच्या व्यवस्थापकाने आमदार अजय चौधरी यांच्याशी संपर्क साधला आणि बँकेच्या अहमदाबाद शाखेला अजय चौधरी यांनी दिलेला 78 लाख रुपयांचा धनादेश मिळालेला आहे,असे सांगितले. चौधरी बैठकीमध्ये व्यस्त असल्याने त्यांनी मुलगा सिद्धेश याला बँक व्यवस्थापकाशी समन्वय साधण्यास सांगितले. वडिलांच्या सूचनेनुसार सिद्धेशने बँक व्यवस्थापकाला असा कोणताही धनादेश त्यांच्या वडिलांनी दिला नसल्याचे कळवले. त्यानंतर बँकेने या धनादेशाबाबतची पुढील प्रक्रिया थांबवली. त्यानंतर बँकेने धनादेश व जमा करण्यात आलेली पावती यांचे छायाचित्र अजय चौधरी यांना ईमेल करून पाठविले.ते पाहिल्यानंतर हा धनादेश व धनादेशावरील स्वाक्षरी बनावट असल्याचे आमदार चौधरी यांनी बँकेला सांगितले. त्यानंतर चौधरी यांनी याप्रकरणी गुरूवारी काळाचौकी पोलिसांकडे लेखी तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.त्या आरोपींनी या बनावट धनादेशाद्वारे अहमदाबाद येथील बँक खात्यात पैसे हस्तांतरीत करण्याचा प्रयत्न केला. ते खाते दवेचे असल्यामुळे पोलिसांनी त्याला अहमदाबाद येथून अटक केलेली आहे. त्यानंतर चौकशीत सुदर्शन दवेने जयेश शहाने त्याला एका यात्रा कंपनी मार्फत हा धनादेश पाठवल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी कांदिवली,मुंबई येथून जयेश शहाला अटक केलेली आहे.
चक्क युनियन बॅंकेचा बनावट धनादेश कसा व कुठे छापला ? यापूर्वी आणखीही काही बनावट धनादेश बनवून वटवले आहेत का ? यासाठी पोलिसांचे विशेष पथक त्यांची चौकशी करत असून त्यांच्या बॅंकेच्या इतर खात्यांची माहिती तपासत आहे. तपासात अजूनही काही माहिती हाती लागण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविलेली आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.