कोर्ट निकाल

आमदार/खासदारांवरील प्रलंबित खटले जलद न्यायालयात चालवावे, सुप्रीम कोर्टात सॉलिसिटरची मागणी

नवी दिल्ली- अ‍ॅमिकस क्युरी यांनी आज सुप्रीम कोर्टाला कळवलेलं आहे की ,दोन वर्षांत खासदार/आमदारांविरुद्ध प्रलंबित खटल्यांची संख्या 4122 वरून 4984 वर पोहोचली आहे, यावरून असे दिसून येते की गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या अधिकाधिक व्यक्ती पवित्र संसद आणि राज्य विधानसभेच्या जागा व्यापत आहेत. सदर बाब लोकशाहीसाठी घातक आहे. अशी टिप्पणी आज सुप्रीम कोर्टात करण्यात आलेली आहे.

खासदार/आमदारांवरील खटले जलदगतीने निकाली काढण्यासाठी आणि विशेष न्यायालयांच्या स्थापनेबाबतच्या खटल्यात न्यायालयाला मदत करण्यासाठी अॅमिकस क्युरी म्हणून नियुक्त केलेले ज्येष्ठ वकील विजय हंसरिया यांनी आज सर्वोच्च न्यायालयासमोर एका अहवालाद्वारे ही माहिती सादर केलेली आहे. सध्याचा अहवाल त्यांनी सादर केलेल्या अहवालांच्या मालिकेत 16 वा आहे.
अमिकसने अंमलबजावणी संचालनालय (ED), केंद्रीय अन्वेषण (CBI) ब्यूरो आणि राष्ट्रीय तपास अन्वेषण (NIA) यांच्यासमोर प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तपासावर देखरेख ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली देखरेख समिती स्थापन करण्याचे निर्देश मागितले आहेत.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.