मुंबईराजकीय
Trending

आमदार निवासातील छत कोसळले, “काय झाडी काय डोंगार” फेम आमदार बचावले

मुंबई : “काय झाडी काय डोंगार ,काय हाटील” या आपल्या अनोख्या शैलीनं गुवाहाटीचं वर्णनं करणारे सांगोल्याचे आमदार शहाजी बापूंच्या call रेकॉर्डींग वर सोशल मिडीयावर प्रचंड मीम्स ,कमेंट आणि लाईकचा पाऊस पडत होता. एकनाथ शिंदे यांच सरकारची सत्ता स्थापन झाली. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. विधानसभा बहुमत चाचणी झाल्यानंतर शहाजी बापूंपुढे मुलाखतींसाठी माध्ममांची लाईन लागली. मात्र त्याच वेळी दुसरीकडे मुंबईत धुव्वाधार पाऊस पडत होता. या पावसाचा फटका मुंबईतील अनेक भागातील जनतेला तर बसलाच आहे. मात्र या पावसाचा फटका सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनाही बसला आहे.

शहाजी बापूंच्या कक्षाचे छत कोसळले

कोसळलेले छत

गुवाहाटीत पंचतारांकीत हॉटेलमध्ये राहून आल्यानंतर आमदार निवसस्थानातील बापुंच्या रुमची अवस्था बघून तुम्हाला विश्वासही बसणार नाही की बापुंचीच रुम आहे का ? बापूंच्या मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातील कक्षाचा छत कोसळलेला आहे. आमदार शहाजी बापू पाटील यांच्या रूम नंबर 312 मधील चेंबरच्या छताचा काही भाग कोसळल्याचे दिसून आले.ही धक्कादायक घटना काल संध्याकाळची आहे. यानंतर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने धाव घेतली आणि छताची पाहणी केली त्यानंतर अधिकाऱ्यांनी दुरुस्तीसाठी रूम ही बंद केली.

आमदार शहाजी बापू पाटील बचावले

आमदारांचे अनेक कार्यकर्ते, गावाकडची लोक मुंबईत कामासाठी आल्यानंतर आमदार निवासात येऊन थांबतात. काम होईपर्यंत त्यांच्यासाठी आमदार निवास हाच त्यांचा निवारा असतो. मात्र सुदैवाने यावेळी कक्षात आमदार शहाजी बापू किंवा इतर कोणीच नसल्यानं मोठी दुर्घटना टळली.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.