Crime

आयशरच्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार

यावल- बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील किनगाव गावाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशरने मोटरसायकला जोरदार धडक दिल्याने या भीषणअपघातात दुचाकीवर चाललेले दाम्पत्य जागीच ठार झाले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,चोपडा येथून भुसावळच्या दिशेने जात असलेल्या आयशर (क्रमांक जीजे २७-व्ही ५८३८ ) या वाहनाने यावलहून चोपड्याच्या दिशेने जाणार्‍या ( क्रमांक एमएच ३० एजे-१८८४ ) या दुचाकीला जोरदार धडक दिली. यावर स्वार असणारे स्त्री -पुरूष हे जागीच ठार झाले.या मोटरसायकलच्या डिक्कित असलेल्या कागदपत्रांवरून हे दोन्ही जण अनुक्रमे पुनमसिंग रतनसिंग राजपूत (वय ५५)आणि संगीताबाई पुनमसिंग राजपूत (वय ४८) हे पती-पत्नी असल्याची माहिती मिळालेली असून ते बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथील रहिवाशी असल्याचे समजते. हा अपघात सकाळी अकराच्या सुमारास घडलेला आहे.,या अपघाताची माहिती मिळतच परिसरातील ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली. मृतदेह यावल येथील रूग्णालयात नेण्यात आले असून या प्रकरणी आयशर चालक तौफिक तोहीद पठाण , रा. अहमदाबाद याचे विरोधात यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.