रेल्वे संबंधी

आॕक्सिजनची “संजीवनी एक्सप्रेस” वेळेत पोहोचविणाऱ्या महिला चालकांचा गर्व- रेल्वेमंत्री पियुष गोयल

नवीदिल्ली- संपूर्ण देशात कोरोना महामारीने हाहाकार माजवलेला असताना देशभरातील राज्यांना मेडिकल ऑक्सिजन पोहचवण्याचे काम रेल्वेने सुरू ठेवलेले आहे. रेल्वेच्या पुरुष कर्मचारयांच्या खांद्याला खांदा लावून खंबीरपणे काम करणारया रेल्वेचालक महिला कर्मचारीही कमी नाहीत याचे प्रत्यंतर आज देशाला आले. संपूर्ण महिला कर्मचारी तैनात असलेली मेडिकल आॕक्सिजन घेऊन ‘संजीवनी एक्प्रेस’ महिला चालक शुक्रवारी बंगळुरूला पोचल्या आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या महिला कर्मचारयांचे तोंडभरून कौतुक केले. आम्हाला या महिला कर्मचाऱ्यांचा गर्व असल्याचे गौरवोद्गार रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी काढलेले आहे. रेल्वेने 120 मेट्रिक टन ऑक्सिजन कर्नाटकातील बंगळुरूत वेळेत पोहचवणारया या महिला कर्मचारयांचे देशातील सर्वच थरातून तोंडभरून कौतुक होत आहे.

जमशेदपूर (टाटानगर ) येथून मेडिकल ऑक्सिजनचे ट्रक घेऊन जाणारी ‘संजीवनी एक्प्रेस’ पूर्ण महिला कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी बंगळुरूला नेली. कोरोनाच्या प्रादुर्भावाला न घाबरता महिला रेल्वे चालकांनी केलेल्या या धाडसाला दाद द्यावी तेवढी कमीच आहे. कर्नाटकासाठी ही सातवी ऑक्सिजन एक्प्रेस महिला चालकांनी आणली याचे तोंड भरून कौतुकच करायला हवे, असे कौतुकाचे उद्गार रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी काढलेले आहेत. यापुढेही भारतीय रेल्वे कोरोना रुग्णांसाठी संपूर्ण देशात मेडिकल आॕक्सिजनचा पुरवठा करण्याचे काम सुरूच ठेवणार आहे, असे आश्वासनही रेल्वेमंत्री गोयल यांनी देशवासीयांना दिलेले आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.