कायदे

आॕक्सिजन अभावी रूग्णाचा मृत्यू झाल्यास शासन जबाबदार – औरंगाबाद खंडपीठ

औरंगाबाद : रूग्णांना आॕक्सिजनचा पुरेसा पुरवठा झाला नाही अथवा ऑक्सिजन नसल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्यास शासनास जबाबदार धरण्यात येईल, असा दुरुस्ती आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश रवींद्र घुगे आणि न्यायाधीश बी. यू. देबडवार यांनी केली आहे.औरंगाबाद खंडपीठाने 19 मे च्या आदेशात ऑक्सिजन न मिळाल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्यास अन्न व औषध विभागाचे सचिव सौरभ विजय आणि चार नोडल अधिकारी यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरण्यात येईल. ऑक्सिजनचा आवश्यक पुरवठा केला नाही तर हे अधिकारी वयक्तिक कारवाईस पात्र ठरतील, असे म्हटले होते.

आजच्या सुनावणीवेळी खंडपीठाने 19 मे च्या आदेशात दुरुस्ती करण्याची विनंती विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर आणि मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे यांनी केली. त्यामुळे खंडपीठाने वरील प्रमाणे दुरुस्ती केली आहे. म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठीच्या 2 लाख 57 हजार 700 इंजेक्शनची ऑर्डर राज्य शासनाने इंजेक्शन निर्मिती करणाऱ्या कंपनीला दिली आहे. मात्र, वाढती रूग्ण संख्या पाहता अधिकच्या इंजेक्शनची आवश्यकता आहे, यावर शासनाने याकडे लक्ष द्यावे, असेही सांगितलेले आहे.

म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचा महात्मा फुले आरोग्य योजनेत समावेश करण्यात आल्याचे सरकारी वकील काळे यांनी निवेदन केले. मात्र, केवळ या योजनेतून रुग्णाला दीड लाख मदत मिळेल या आजाराच्या इंजेक्शनचा खर्च आठ लाख रूपये इतका आहे. यावर शासन काय विचार करतोय, असेही खंडपीठ म्हणालेले आहे. दरम्यान या सुनावणीस विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, घाटी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर आणि अन्न व औषधी विभागाचे वरिष्ठ अधिकारी हजर होते.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.