आॕनलाईन लोन ॲप द्वारे कर्ज घेताना सावधान- महाराष्ट्र सायबर पोलिस

मुंबई (सूत्र)दि-07 – कोविड -१९ महामारीच्या काळात आणि त्या नंतर या महामारीमुळे लाखो लोकांनी आपल्या नोकऱ्या व कामधंदे गमावले आणि लघु व्यवसाय मालकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागला, ज्यामुळे पैशाची गरज वाढली. अश्यावेळी बरेच अनधिकृत डिजिटल प्लॅटफॉर्म कडून कर्ज देण्यात येते. झटपट, पेपरलेस आणि त्रास-मुक्त कर्ज प्रक्रियेचे वचन देणारे बरेच मोबाइल अॅप्लिकेशन आहेत.त्यामुळे, लाखो भारतीय इन्स्टंट लोन अॅप डाउनलोड करीत आहेत. असा अंदाज आहे की 500,000 पेक्षा जास्त लोकांना घोटाळेबाजांनी लुटले आहे, त्यातून मार्च 2020 अखेरी या अॅप्सवरून अंदाजे 15 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. आता तर या लोन कंपनीचे अल्प मुदतीचे कर्ज वेळेवर न फेडल्यास त्यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून अनेकांनी आत्महत्या केल्याची प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. याबाबत नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन महाराष्ट्र पोलिस सायबर सेल तर्फे करण्यात आलेले आहे.
फसवणूक करणारे अँप्लिकेशन, कसे ओळखावे:
1) कर्ज देणाऱ्या अँप्लिकेशनचा कोणताही कार्यालयीन पत्ता नसतो
2) कर्ज देणारे अँप्लिकेश आपल्या पुर्वव्यवहारा बद्दल विचारणा करत नाही.
3) अनुचितपणे फी जाहीर करते.
4) कर्ज देणारे अँप्लिकेशन आपल्यावर त्वरित कार्य करण्यास दबाव आणते.
योग्य कर्ज देणारे अँप्लिकेशनचा शोध घेताना या गोष्टी तपासून पहा :
1)कर्ज देणाऱ्या अँप्लिकेशनशी संपर्क करण्यासाठीची माहिती जसेकी फोन नंबर,ईमेल आणि कार्यालयाचा पत्ता वेबसाइटवर सहज
उपलब्ध असावा.
2) ऑनलाइन पुनरावलोकने तपासा. ऑनलाइन पोस्ट करणारे ग्राहक कर्जदाराबरोबर काम करण्याचा अनुभव देतात.
3) वेगवेगळ्या व्यावसायिक वेबसाइट्सकडे पहा जे वेळोवेळी विविध कर्ज अॅप्सचे पुनरावलोकन करतात, एखादा कर्जदाता विश्वासू आहे
की नाही हे शोधण्याचा एक चांगला मार्ग आहे.
4) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करा.
5)कर्ज देणारे अॅप्लिकेशनकडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा (आरबीआय), मोबाइल ओन्ली Non-Banking Financial Company (NBFC)
परवाना आहे ज्यामुळे ते आपल्याला कर्ज देण्यास परवानगी देतात याची खात्री करा.