अकोलाराजकीयविदर्भ

आ.अमोल मिटकरींचा वाढदिवस आणी “टरबूज” भेटलं गिफ्ट, कापा सांगितल्यावर पुढे काय झालं …

आ.अमोल मिटकरींचा वाढदिवस आणी “टरबूज” भेटलं गिफ्ट, कापा सांगितल्यावर पुढे काय झालं …

अकोला : राष्ट्रवादीचे युवानेते आणी विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांचा आज वाढदिवस होता. अनेकांनी मिटकरी यांना वाढदिवसानिमित्त भेटून परस्पर शुभेच्छा आणि भेटवस्तू दिल्या. मात्र, यादरम्यान शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या काही तरूणांनी अमोल मिटकरी यांना एक आगळं वेगळं “गिफ्ट”दिले. मात्र या अनोख्या “गिफ्ट”ची सोशल मीडियावर चांगलीच जोरदार ट्रोलींग आणि मार्मिक फटकेबाजी सुरू आहे.सहसा काही जण वाढदिवसानिमित्त सीलबंद वस्तू किंवा काहीतरी फोटोफ्रेम वगैरे देत असतात.मात्र यात तसं काहीही नव्हतं. या कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींना वाढदिवसानिमित्त चक्क ‘टरबूज’ भेट दिलेलं आहे.आणी मिटकरींनी ते प्रांजळपणे स्वीकारलं सुद्धा आहे.
दरम्यान, वाढदिवसाला कुठला केक न कापता हे ‘टरबूज’ कापण्यात यावं असा हट्ट या तरूणांनी धरला. परंतू, सद्यस्थितीत राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी या ‘टरबूज’ मुळेच घडत आहेत, असा हसत हसत खोचक टोला त्यांनी यावेळी लगावला. त्यामुळेच आपण हे ‘टरबूज’ कापणार नाही. पण आपण आणलेल्या भेटवस्तूचा मान ठेवत हे ‘टरबूज’ स्वीकारतोय, असं म्हणत अमोल मिटकरी यांनी या तरूणांकडून ‘टरबूज’ स्वीकारले.मात्र सध्या या अनोख्या “गिफ्ट” संदर्भात सोशल मीडियावर जोरदार ट्रोलींग आणि मार्मिक फटकेबाजी सुरू आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.