केंद्रीय योजना

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक देणार महिंद्रा रूरल हाऊसिंग फायनान्स च्या ग्राहकांना घरबसल्या पैसे भरण्याची सुविधा

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 3 – इंडिया पोस्ट पेमेंटस बँक (आयपीपीबी) आणि महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल लिमिटेडची उपकंपनी असलेल्या महिंद्रा रुरल हाउसिंग फायनान्स लिमिटेड (एमआरएचएफएल) यांनी रोकड व्यवस्थापन सोल्यूशनसाठी सामायिक भागीदारी करीत असल्याची घोषणा केली आहे.
            या कारारनाम्याचा भाग म्हणून इंडिया पोस्ट पेमेंटस बँक आपली संपर्क केंद्रे आणि टपाल सेवा पुरवठादार यांच्यामार्फत महिंद्रा रुरल हाउसिंग फायनान्स लिमिटेडला रोकड व्यवस्थापन आणि संकलन सेवा देणार आहे. रोकड व्यवस्थापन सेवेमुळे महिंद्रा रुरल हाउसिंग फायनान्स लिमिटेडच्या ग्राहकांना इंडिया पोस्ट पेमेंटस बँकेच्या १ लाख ३६ हजार टपाल कार्यालयांमधून आपल्या कर्जाचे मासिक किंवा तिमाही हप्ते भरता येणार आहेत.
            रोकड व्यवस्थापनासाठी दोन्ही संस्थांनी केलेली हातमिळवणी ही वित्तीय सेवा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण भागीदारी आहे. आणि यातून ग्राहकांना सामावून घेण्याचे दोन्ही संस्थांचे लक्ष्य आहे. इंडिया पोस्ट पेमेंटस बँकेचे मोठे राष्ट्रीय नेटवर्क आणि साधे, स्केलेबल आणि प्रतिकृतीयोग्य तंत्रज्ञानाचे फ्रेमवर्क यामुळे महिंद्रा रुरल हाउसिंग फायनान्स लिमिटेडच्या आवश्यकता पूर्ण करण्याच्यादृष्टीने रोकड व्यवस्थापनाचे सोल्यूशन लागू करता येणार असल्याचे उ. प्र. दुसाने, डाक अधीक्षक, भुसावळ विभाग, भुसावळ यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.