मुंबई

इस्त्रायलचे कॉन्सुलेट जनरल कोबी शोशानी यांनी घेतली पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांची भेट

मुंबई, दि. 6 : इस्त्रायलचे कॉन्सुलेट जनरल कोबी शोशानी यांनी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांची मंत्रालयातील दालनात भेट घेतली.

यावेळी प्रधान सचिव संजीव जयस्वाल, सचिव अभिषेक कृष्णा व अन्य अधिकारी उपस्थित होते.

इस्त्रायलचे काँन्सुलेट जनरल कोबी शोशानी म्हणाले, भारताची ताकद सर्व क्षेत्रात असून महाराष्ट्र हे प्रगतीपथावरील राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जल-व्यवस्थापन क्षेत्रातही मोठे योगदान आहे. पाणी शुद्धीकरण प्रकल्पांसाठी मदत करण्यासाठी इस्त्रायल उत्सुक असून यासंदर्भातील अत्याधुनिक तंत्रज्ञान इस्त्रायलकडे असल्याचे श्री. शोशानी यांनी सांगितले.

यावेळी राज्यातील विविध पाणीपुरवठा योजनांवर तसेच राज्यातील जल-व्यवस्थापन  क्षेत्रातील विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांवरही चर्चा झाली.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.