क्राईम

“ईडी”ची संकेत मिडियावर धाड, 2.70 कोटींची संपत्ती जप्त

सूरत- अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी पैशाच्या गैरव्यवहार प्रकरणी संकेत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक पीव्हीएस सरमा यांना अटक केली आहे. गुजराती व इंग्रजीत प्रसिद्ध झालेल्या दोन दैनिकांच्या अनियमितता आणि आरोप-प्रत्यारोपांच्या आरोपाखाली सरमा यांना अटक करण्यात आल्याची माहिती ईडीने आपल्या ट्विटर अकाउंट द्वारे दिलेली आहे.
संकेत मीडीया प्राईवेट लिमिटेडचे ​​संचालक पीव्हीएस सरमा यांना गुरुवारी अटक केली गेली आणि “फसवणूक आणि खोटेपणाशी संबंधित” याप्रकरणी मनी लाँड्रिंग प्रिंटिंग (पीएमएलए) कायद्याच्या तरतुदीखाली अटक करण्यात आली, असे एजन्सीने म्हटले आहे.अहमदाबादच्या कोर्टाने त्याला 2 डिसेंबरपर्यंत ईडीच्या ताब्यात पाठविले, असे त्यात म्हटले आहे. आयकर विभागाने त्यांच्याविरूद्ध दाखल केलेल्या गुजरात पोलिसांच्या एफआयआरचा अभ्यास केल्यानंतर सरमा, त्यांची मीडिया कंपनी आणि इतरांवर गुन्हा दाखल केला असल्याचे ईडीने ट्विट केलेले आहे.यामुळे माध्मम क्षेत्रात मोठी खळबळ उडालेली आहे.
Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.