क्राईम

“ईडी” ने प्रविण राऊत यांची 72 कोटींची संपत्ती केली जप्त,राज्यात खळबळ

मुंबई(वृत्तसंस्था)-शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावल्यामुळे भाजपा आणि शिवसेनेत घमासान पाहायला मिळाले. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी प्रवीण राऊत यांची ईडीने 72 कोटींची मालमत्ता जप्त केलेली आहे. ईडीने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिलेली आहे. यामुळे राजकीय गोटात प्रचंड खळबळ उडालेली आहे.ईडीने पीएमसी बँक घोटाळ्यात मनी लाँडरिंग प्रकरणी प्रवीण राऊत यांची 72 कोटींची मालमत्ता जप्त केलेली आहे. यापूर्वी या प्रकरणामध्ये ईडीने प्रवीण राऊत यांच्यावर संशय व्यक्त करत त्यांच्याकडे कोट्यवधींची बेकायदेशीर संपत्ती असल्याचा दावा ईडीने केला. सदरील प्रकार हा पीएमसी बँक कर्ज प्रक्रियेत घोटाळा करून मनी लाँड्रिंग कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हणत ही संपत्ती ईडीने जप्त केलेली आहे. त्यामुळे प्रवीण राऊत यांच्या कायदेशीर अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आहे. प्रविण राऊत हे खा.संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याने हा त्यांच्या साठी खूप मोठा धक्का मानला जात आहे.

त्याचप्रमाणे खा. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावलेला होता. त्यांना 29 डिसेंबर रोजी ईडीच्या मुंबई येथील बॅलार्ड पिअर येथील कार्यालयामध्ये हजर होण्याचे सांगितले होते. मात्र, खा.संजय राऊत यांनी ईडीकडे यासाठी वाढीव मुदत मागीतली होती. त्यानुसार वर्षा राऊत यांना दुसरे नवीन समन्स ईडीने बजावले असून 5 जानेवारीला चौकशीसाठी बोलाविलेले आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.