केंद्रीय योजना

‘ई-संजीवनी’-या केंद्र सरकारच्या मोफत टेलीमेडिसिन सेवेने 70 लाख रुग्णांना ऑनलाईन वैद्यकीय सल्ल्याचा टप्पा केला पूर्ण

नवी दिल्ली, 6जुलै 2021
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची राष्ट्रीय टेलिमेडिसिन सेवा- ई-संजीवनीने 70 लाख लोकांना मोफत ई वैद्यकीय सल्ला देण्याचा टप्पा पूर्ण करत, आणखी एक मैलाचा दगड पार केलेला आहे. यंदाच्या जून महिन्यात या सेवेचा 12.5 लाख रुग्णांनी लाभ घेतला, गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात ही सेवा सुरु झाल्यापासूनची सर्वाधिक लाभार्थी संख्या आहे.
सध्या, राष्ट्रीय टेलीमेडीसीन सेवा 31 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत आहे.
ई संजीवनी AB-HWC–हा डॉक्टर ते डॉक्टर टेलिमेडीसीन प्लॅटफॉर्मची अंमलबजावणी 21,000 आरोग्य आणि निरामयता केंद्रामधून स्पोक्ससारखी म्हणजे एका केंद्रापासून अनेक ठिकाणी या पद्धतीने केली जाते  तसेच 30 राज्यांमध्ये  जिल्हा रूग्णालाये आणि वैद्यकीय महाविद्यालयात त्याची 1,900 केंद्रे आहेत. डॉक्टर ते डॉक्टर टेलिमेडीसीन प्लॅटफॉर्मवरून आतापर्यंत 32 लाख रुग्णांपेक्षा सेवा मिळाली आहे. संरक्षण मंत्रालयाने देखील ई-संजीवनी OPD सेवा सुरु केली आहे, ज्यावर संरक्षण सेवांशी संबंधित 100 ज्येष्ठ डॉक्टर्स आणि विशेषज्ञ देशभरातील रूग्णांना ही सेवा देत असतात.
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर  ई-संजीवनी OPD म्हणजेच बाह्य रुग्ण विभाग सेवेची सुरुवात केली होती.
ई-संजीवनी OPD वरून 420 ऑनलाईन OPD चालवल्या जातात.आणि हा प्लॅटफॉर्म  स्पेशालिटी आणि सुपर-स्पेशालिटी ओपीडी देखील चालवल्या जातात. पाच राज्यांतल्या एम्ससारख्या मोठ्या रूग्णालयांद्वारे या सेवा दिल्या जातात. गेल्या दोन आठवड्यात, 50,000 पेक्सा जास्त रूग्णांनी ई-संजीवनी सेवांचा लाभ घेतला असून 2,000 डॉक्टर्स रोज ही सेवा देत असतात.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय या राष्ट्रीय टेलिमेडीसीन सेवेला अधिकाधिक अद्ययावत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. गेल्या महिन्यात, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि मोहालीतील C-DAC च्या समन्वयाने ई-संजीवनी सेवा देशातील 3.75 सामाईक सेवा केंद्रातून मोफत दिली जाण्याची तांत्रिक व्यवस्था केली. एक जुलै 2021 रोजी, सहाव्या डिजिटल इंडिया उपक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ई-संजीवनी सेवेचे कौतुक केले. तसेच बिहारमधल्या पूर्व चंपारण येथील ई-संजीवनी योजनेच्या लाभार्थ्याशी संवाद साधला. हा लाभार्थी आपल्या लखनौ इथल्या आजारी आजीसाठी वृद्धापकाळाने होणारे आजार आणि मानसिक आजारांवर ई-संजीवनी उपचार सेवेचा लाभ घेत आहे.
अगदी अल्पावधीतच, केंद्र सरकारच्या राष्ट्रीय टेलिमेडिसिन सेवेने एकूणच भारतीय आरोग्य सेवेला मोठी मदत केली आहे. या व्यापक सेवेमुळे शहरी आणि ग्रामीण भागातील  डिजिटल दरी कमी होण्यासही मदत झाली आहे. राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानाशी सुसंगत, अशा ई-संजीवनी सेवेमुळे डिजिटल आरोग्य अर्थव्यवस्थेला चालना मिळते आहे.

देशातील 10 राज्यात ई-संजीवनी योजनेअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या सेवांची माहिती :
: ई-संजीवनी ही सेवा अँड्रोईड ॲपवर उपलब्ध आहे.https://esanjeevaniopd.in

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.