निवडणूकमुंबईराजकीय

उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का,कालपर्यंत शिंदे गटाला प्रखर विरोध करणारा आमदार आता शिंदे गटात दाखल

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना काल दोन मोठे धक्के बसलेले होते.त्यातून सावरत नाही तोच शिवसेनेला बहुमत चाचणीच्या आधी आणखी मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. संतोष बांगर हे काल विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान शिवसेनेसोबत होते. शिवसेनेच्या सुनील प्रभू यांचा व्हीप मानत संतोष बांगर यांनी काल शिवसेनेच्या बाजून मतदान सुद्धा केलं होतं. मात्र आज त्यांनी बदलेल्या भूमिकेमुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे.
संतोष बांगर आज हॉटेल ताज प्रेसिडन्सीमध्ये उपस्थित झालेले पाहायला मिळाले. संतोष बांगर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पाहून अनेकांच्या भुवया उंचवल्या. त्यानंतर संतोष बांगर हे शिंदे गटातील आमदारांसोबत बस मधून विधानभवनात रवाना झाले आहे. संतोष बांगर यांच्या बंडखोरीमुळे आता शिंदे गटातील शिवसेनेच्या आमदारांची संख्या आता 40 वर पोहोचली आहे. तर शिवसेने सोबतच्या आमदारांची संख्या आता 15 वर खाली आली आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोर आमदार ज्यावेळी गुवाहाटी येथे पोहोचले होते, तेव्हा आमदार संतोष बांगर यांनी आक्रमक दिसले होते. या बंडखोर आमदारांविरोधात त्यांनी जोरदार आंदोलन देखील केले होते. आपण कायम उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचं त्यांनी सांगीतल होतं. मात्र ते अचानक शिंदे गटात सामील झाल्याने आणखी किती आमदार फुटून शिंदे गटात सामील होणार ? आता उद्धव ठाकरे ही आमदारांची गळती कशी थांबवणार ? अशा चर्चांना उधाण आलेल आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.