मुंबईराजकीयशासन निर्णय

उद्धव ठाकरेंना विधानसभा सचिवालयाचा मोठा धक्का | शिवसेना विधीमंडळ प्रतोदपदी एकनाथ शिंदे गटाचे भरत गोगावले कायम

मुंबई : रविवार हा शिवसेनेसाठी अत्यंत धक्कादायक ठरलेला आहे.विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर शिवसेनेचे अजय चौधरी यांची गटनेता म्हणून मान्यता रद्द करण्यात आल्याने आणखी एक मोठा धक्का बसलेला आहे. एकनाथ शिंदे हेच गटनेता असतील. विधिमंडळ सचिवालयानं एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले आहे.

हे पण वाचा :शिवसेनेचे 7 खासदार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात, चार खासदारांनी आज भेट घेतल्याची सूत्रांची माहिती


सुनिल प्रभुंचे प्रतोद पद रद्द


शिवसेनेच्या वतीने अजय चौधरी यांना गटनेता म्हणून नियुक्त करण्यात आले होते. ही नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. तसेच सुनिल प्रभू यांची मुख्य प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती रद्द करुन भरत गोगावले यांची मुख्य प्रतोद पदावर नियुक्ती करण्यात आली आहे, असं पत्र विधानमंडळ सचिवालयानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांना पाठवले आहे.
या पत्रात नेमकं काय म्हटलयं ?
22 जून रोजी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना यासंदर्भातील ठरावाच पत्र देण्यात आलेलं होते.त्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना विधीमंडळ गटनेते पदावरून दूर करुन अजय चौधरी यांची निवड करण्यात आली होती. याबाबत कायदेशीर तरतूदींचा अभ्यास करून महाराष्ट्र विधानसभा सभापती यांनी अजय चौधरी यांना शिवसेना विधिमंडळ पक्षाचे गटनेते म्हणून रद्द करुन एकनाथ शिंदे यांची दिनांक 31 ऑक्टोबर 2019 रोजी गटनेते म्हणून करण्यात आलेली नियुक्ती कायम केलेली आहे. सुनिल प्रभू यांची मुख्य प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती रद्द करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे भरत गोगावले यांची मुख्य प्रतोद पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.यामुळे आता शिवसेना या नियुक्तीच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.