राज्य-देश

उद्यापासून आंतरजिल्हा एसटी बस सुरू होणार

कोविडं-19 महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या मार्च महिन्या पासून महाराष्ट्राची जीवनवाहिनी लालपरीची सेवा बंद ठेवण्यात आली होती. मधल्या काळात जिल्ह्याच्या सीमा न ओलांडता सेवा सुरू करण्यात आली. आज महाराष्ट्र पूर्वपदावर येत असताना आंतरजिल्हा सेवेचा पुन:श्च हरी ओम करण्यात येत असून लालपरी पुन्हा पूर्वीप्रमाणेच सेवा देणार आहे.
उद्या दि २० पासून एसटीची साधी,निमआराम,शिवशाही, शिवनेरी या सर्व प्रकारच्या सेवा टप्प्याटप्प्याने सुरू होतील त्यातील लांब व मध्यम पल्याच्या बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध होतील. या प्रवासासाठी कोणत्याही ई-पासची आवश्यकता नसेल व कोणतेही ज्यादा दर आकारले जाणार नाहीत.परंतु बस मध्ये फिजिकल डिस्टनसिंग चे पालन करून प्रवाशी प्रत्येक सीट वर एकच प्रवाशी बसविण्यात येईल.प्रत्येक प्रवाशाला मास्क आवश्यक असेल तसेच चालक वाहकालाही मास्क प्रवासात आवश्यक असेल.
एका बाकावर एक प्रवाशी प्रवास करतील तसेच प्रवाश्यांना प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नाही.परंतु खाजगी बसने प्रवास केल्यास ई- पास बंधनकारक आहे.
प्रवाशांना मास्क बंधनकारक राहील मास्क नसल्यास रुमाल नाका तोंडाला बांधणे बंधनकारक राहील. प्रवाशांना तालुक्यातून, जिल्ह्यातून, व महाराष्ट्रातून सर्व ठिकाणी जाता येता येईल .
सर्व प्रकारचे प्रवासी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, या सर्व प्रवाशांना प्रवास करता येईल. कुठलीही भाडेवाढ न करता प्रवास करता येईल.
एस.टी.प्रवाशी सेवा फक्त महाराष्ट्रा पुरती मर्यादित असून.महाराष्ट्रा बाहेर इतर राज्यात प्रवासासाठी परवानगी नाही.अशी प्रवाशी सेवा सुरू होत आहे.अशी माहिती एका परिपत्रकाप्रमाणे देण्यात आलेली आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.