आरोग्य

उद्या जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी आॕनलाईन प्रक्रिया मार्गदर्शन वेबिनारचे आयोजन

मुंबई, दि. 8 : जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन प्रक्रियेबाबतच्या मार्गदर्शनासाठी उद्या दि. 9 मार्च 2021 रोजी दुपारी 3.00 वाजता Zoom अॅपद्वारे ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, मुंबई उपनगरचे उपायुक्त यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे  दिली आहे.
सन 2020-2021 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 12 वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहेत. तसेच ज्यांना पुढील शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावयाचा आहे अशा अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राखीव प्रवर्गातून प्रवेश घेणेसाठी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यक असते. परंतु अनेक विद्यार्थी व पालकांना वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज कसा करावा, कधी करावा याबाबत माहिती नसते. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या वेळी त्यांचीं गोंधळाची परिस्थिती निर्माण होते.
जे अधिकारी किंवा कर्मचारी शासकीय नोकरीत आहेत त्यांचेसाठीसुध्दा जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते. जात वैधता प्रमाणपत्राचे सुलभीकरण व्हावे व अर्जदारांना लवकरात लवकर वैधता प्रमाणपत्र मिळावे व कामकाजात पारदर्शकता यावी याकरिता शासनाने ऑगस्ट, 2020 पासून ऑनलाईन सुविधा सुरु केलेली आहे. परंतु बरेच अर्जदारांना ऑनलाईन प्रक्रियेबाबत माहिती नाही. याकरिता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, मुंबई शहर व मुंबई उपनगर यांनी दि. 9 मार्च, 2021 रोजी दुपारी 3.00 वाजता Zoom अॅपद्वारे ऑनलाईन वेबिनारचे आयोजन केले आहे.
वेबिनारमध्ये ऑनलाईन अर्ज कसा करावा, कोणकोणती कागदपत्रे सादर करावी याचे मार्गदर्शन समितीचे अध्यक्ष, उपायुक्त व संशोधन अधिकारी करणार आहेत. वेबिनारमध्ये सहभागी होणेसाठी खालील लिंक देण्यात येत आहे. तरी सर्व विद्यार्थी, पालक, महाविद्यालयांमधील प्राचार्य. कर्मचारी वर्ग व शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी आपला सहभाग नोंदवावा .
Zoom Meeting लिंक खालील प्रमाणे आहे.
Topic: Caste Certificate Verification and other helping aspects Time: Mar 9, 2021 03:00 PM
Join Zoom Meeting
https://us04web.zoom.us/j/8027832431?pwd=UEJwNFp2WWxHeFRpcUpvN2UxVkxOdz09
Meeting ID: 802 783 2431
Passcode: caste123

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.