क्राईम

उपजिल्हा रूग्णालयाच्या निवासस्थानी अश्लील चाळे ! तिघांवर गुन्हा दाखल

जामनेर – येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या शासकीय निवासस्थानात अनैतिक कृत्य करताना काल एका प्रेमीयुगलास परिसरातील नागरिकांनी रंगेहाथ पकडलेले होते. याबाबत जामनेर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडालेली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की Covid-19 च्या प्रादुर्भावामुळे एका कंत्राटी वार्डबॉयला शासकीय निवासस्थान राहावयास देण्यात आलेले होते,मात्र सदरचा कर्मचारी हा बाहेरील स्त्री-पुरुषांना आपले शासकीय निवासस्थान अनैतिक कृत्य करण्यासाठी वापरण्यास देत होता. याची कुजबुज परिसरातील नागरिकांना लागलेली होती. अखेर काल सकाळी शेजारी राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडलेले असून ते प्रेमीयुगल व सदरील कंत्राटी वार्डबाॕयला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. त्यांचे विरोधात भा.द.वि. कलम 112 व 117 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विनय सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करण्याचे पत्र जिल्हा शल्य चिकित्सक यांना देण्यात आलेले आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.