Crime

एकनाथराव खडसेंचा राष्ट्रवादीत “ग्रँड” प्रवेश, भाजपाला खिंडार

मुंबई (वृत्तसंस्था)- भाजपचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी पक्षाची 40 वर्षे एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून सेवा केल्यानंतर त्यांच्यावर भारतीय जनता पक्षाने अन्याय केल्याची भावना त्यांच्या मनात होती. त्यातून त्यांच्या मनात या अन्यायाविरोधात कायम असंतोष खदखदत होता. पक्षाने केलेल्या अन्यायाला कंटाळून आज अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पक्षप्रवेशाचा मुहुर्त गवसला,आणि खडसे यांनी आज दुपारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात पक्षाध्यक्ष खा.शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात “ग्रँड” प्रवेश केला. यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी जळगाव जिल्हा दूध फेडरेशनच्या अध्यक्षा सौ.मंदाताई खडसे आणि जिल्हा बँकेच्या अध्यक्षा सौ. रोहिणीताई खडसे व इतर 72 समर्थक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी उत्तर महाराष्ट्रातील अनेक माजी आमदार ,नगरसेवक ,जि.प. सदस्य .पं.स.सदस्य तसेच भाजपाचे इतर खडसे समर्थक पदाधिकारी यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक दिग्गज नेते मंचावर उपस्थित होते.
एकनाथराव खडसे यांचा मुंबईत राष्ट्रवादीत प्रवेश होताच त्यांच्या मुक्ताईनगरस्थित निवासस्थाना समोर समर्थक कार्यकर्त्यांनी फटाके फोडून एकच जल्लोष केला.
एकनाथराव खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेश हा उत्तर महाराष्ट्रात भाजपाला खिंडार पाडणारा नक्कीच राहणार आहे. जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषद , पंचायत समित्यांसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थां तसेच अनेक मोठ्या सहकारी संस्थांवर एकनाथराव खडसेंचे किंवा त्यांच्या कट्टर समर्थक कार्यकर्त्यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे या सर्व संस्था आता राष्ट्रवादीमय होणार असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. खडसेंसारखा मोठा जनाधार असलेला ओबीसी नेता गमाविल्याने भाजपाला येणाऱ्या काळात खूप मोठा राजकीय फटका नक्कीच बसू शकतो. तसेच जळगाव जिल्ह्यातील अनेक राजकीय समीकरणे आता बदलणार असून अनेक उलटफेर होणार आहेत. तसेच जिल्ह्यातील स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांशी खडसे कसे जम बसवतात हे पाहणे औत्स्युक्याचे ठरेल. तसेच त्यांना राज्य मंत्रीमंडळात मंत्रीपद मिळाल्यास त्याचा जिल्ह्यातील विकासासाठी नक्कीच फायदा होईल. तसेच शरद पवार समर्थक मराठा व मुस्लिम समाजासह आता येणाऱ्या काळात एकनाथराव खडसे यांना मानणारा खान्देशातील बहुसंख्य लेवा पाटीदार समाजाचा मतदार राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळल्यास भविष्यात राष्ट्रवादीचा पाया उत्तर महाराष्ट्रात आणखी भक्कमपणे रचला जाऊ शकतो, असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे.

आज प्रवेश केल्यानंतर खडसे यांनी जबरदस्त टोलेबाजी करत म्हणाले की,आजपर्यंत पक्षाचे प्रत्येक काम निष्ठेने केले आणि पुढेही करत राहीन, मी आजपर्यंत कोणाच्याही पाठीत खंजीर खुपसले नाहीत. “माझ्या मागे ईडी लावल्यास मी सीडी लावेल” असा टोलाही खडसे यांनी लगावला.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.