राजकीय

एकनाथराव खडसेंचा एक बंगला,3 फ्लॕट,7 प्लाॕटसह 5 कोटींची संपत्ती ईडी कडून जप्त झाल्याने खळबळ

मुंबई (वृत्तसंस्था) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांची 4.86 कोटी रूपयांच्या अचल मालमत्ता आणि 86.28 रूपयांच्या बँक खात्यातील रक्कम अशा एकूण 5 कोटी 73 लाख रुपयांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी)कडून जप्त करण्यात आलेली आहे. याबाबत आता ईडीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे ट्विट केलेले आहे.यात खडसे यांची लोणावळा, व जळगाव येथील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.या मालमत्तांमध्ये एक बंगला, 3 निवासी फ्लॅट, 7 जमीन प्लाॕट आणि 86.28 लाख रुपयांची बँक शिल्लक आहे.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पत्नी मंदाताई खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी 2016 या वर्षी भोसरी येथील एमआयडीसीतील जमीन मूळ जमीन मालकाकडून 3.75 कोटी रुपयांना खरेदी केलेली होती. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंदही केलेली होती. अशा प्रकारे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या आणि उकानींच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारनोंदी कागदोपत्री मालक झाले होते. मात्र या सर्व व्यवहारात सुमारे 61 कोटी रुपयांचा महसुल बुडाल्याचे ईडीला प्रथमदर्शनी दिसून येत आहे. हा एक मोठा आर्थिक गैरव्यवहार असल्याचा ‘ईडी’ला संशय आहे. या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडालेली असून खडसेंची कन्या रोहिणीताई खडसे या अध्यक्षा असलेल्या जळगाव जिल्हा बँकेच्या येणाऱ्या निवडणूकीवर याचे पडसाद पडतील का ? याबाबत राजकीय गोटात “जर-तर” वरून विविध अंदाज वर्तवून हालचाली सुरू झालेल्या आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.