राजकीय

एकनाथराव खडसेंच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस दाखल, खा.रक्षा खडसेंची घेतली भेट

मुक्ताईनगर: भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी त्यांनी भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांची भेट घेऊन पक्ष बांधणीवर चर्चा केली. मात्र यावेळी एकनाथराव खडसे मुक्ताईनगरमध्ये नसून ते मुंबईत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. मात्र,देवेंद्र फडणवीस हे आमदार गिरीष महाजन यांच्यासह थेट खडसेंच्या घरी आल्याने जिल्ह्यातील राजकीय गोटात तर्कवितर्कांना उधाण आलेले आहे. या बैठकीत जिल्ह्यातील भाजप सोडून जात असलेल्या नगरसेवक व कार्यकर्त्यांविषयी खलबते झाल्याचे बोलले जात आहे.


दरम्यान,फडणवीस यांनी मुक्ताईनगर तालुक्यात खासदार रक्षा खडसे ,आ.गिरीष महाजन यांचेसह नुकतेच वादळाने नुकसान झालेल्या परिसरात जाऊन पाहणी केली.
एकनाथराव खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच मुक्ताईनगरमध्ये आलेले आहे. त्यामुळे या दौऱ्याला भाजपच्या दृष्टीने महत्त्व आलेले आहे. सध्या भाजपमधील सुरू असलेली गळती फडणवीस कशी रोखणार ? याकडे राजकीय धुरीणांचे लक्ष लागून आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.