राजकीय

एकनाथराव खडसेंना “ईडी”ने नोटीस पाठविली? जिल्ह्यात खळबळ

मुंबई: भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना भोसरी (पुणे) येथील भूखंड खरेदी प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती TV9मराठी या आघाडीच्या वृत्तवाहिनीने विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने दिलेली आहे. त्यात सक्तवसुली संचालनालयाने 30 तारखेला एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे सूतोवाच केले असल्याची माहिती मिळत आहे. ईडीची नोटीस येणे हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथराव खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. या नोटीसबाबत एकनाथराव खडसे यांच्याशी संपर्क केला असता अजून नोटीस मिळालीच नसल्याचे त्यांनी सांगितलेले आहे.याबाबत नंतर चित्र स्पष्ट होईलच मात्र या वृत्तामुळे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडालेली आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.