राजकीय
एकनाथराव खडसेंना कोरोनाची लक्षणे, “ईडी” कार्यालयात चौकशीला जाणार नाही- सूत्र

मुंबई – राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी ) नोटीस मिळाल्यानंतर उद्या 30 डिसेंबर रोजी “ईडी” कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचा समन्स देण्यात आलेला होता. भोसरी (पुणे) येथील भूखंड खरेदी प्रकरणात एकनाथराव खडसे यांना ही नोटीस बजावण्यात आलेली आहे.
एकनाथराव खडसे हे मुंबईत दाखल देखील झाले आहेत, मात्र ते उद्या “ईडी” कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत एकनाथ खडसे यांनी कोर्टात प्रतिज्ञापत्र देखील सादर केले आहे.
एकनाथराव खडसे यांना कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याची माहिती त्यांच्या वकिलांमार्फत कोर्टात दिली गेली असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.