राजकीय

एकनाथराव खडसेंना वाढदिवसानिमित्त मोठे “गिफ्ट” मिळणार ? “ती” तारीख भेटली

मुंबई : गेले आठ महिने राज्याच्या राजकारणात गाजत असलेल्या विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या मुद्द्यांवरुन पुन्हा एकदा राज्यातील राजकारण ढवळून निघालेले आहे. महाविकास आघाडी सरकारकडून राजभवनाकडे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीची वेळ मागण्यात आली होती. पण राजभवनाकडून वेळ देण्यात आलेली नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलेले आहे. तर दुसरीकडे सायंकाळच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद नार्वेकर राजभवनावर दाखल झाले होते. त्यांनी राज्यपालांकडे या मुद्द्यावरून भेटीसाठी वेळ मागितली. त्यानंतर राजभवनाकडून 1 सप्टेंबरला भेटीसाठी वेळ दिलीय. त्यामुळे आता 1 सप्टेंबरला 12 आमदारांच्या नियुक्तीचा तिढा सुटणार का ? आणि सुटल्यास “त्या” 12 आमदारांमध्ये राष्ट्रवादीकडून आलेल्या यादीत नाव समावेश असलेल्या एकनाथराव खडसे यांना आमदारकी मिळून “मविआ”कडून मंत्रीपद मिळणार का ? हाच सध्या खान्देशसह राज्याच्या राजकारणात सर्वात मोठा चर्चेचा विषय ठरलेला आहे. कारण येत्या 2 सप्टेंबर रोजी एकनाथराव खडसे यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे 1 तारखेला राज्यपालांनी या रिक्त जागांचा निर्णय घेऊन खडसेंना विधान परिषदेवर घेतल्यास खडसे व त्यांच्या समर्थकांसाठी ही खूप मोठी नवचैतन्याची वार्ता ठरणार आहे. कारण खडसे हे गेल्या पाच वर्षांपासून मंत्रीपदापासून दूर आहेत. खडसेंना यावेळी मंत्रीपद मिळाल्यास त्यांच्या समर्थकांना पुन्हा हत्तीचे बळ मिळणार असून याचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच फायदा मिळू शकतो असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे.

आज दुपारी 4 वाजेपर्यंत राज्य सरकारकडून राजभनवाकडे वेळ मागण्यात आलेली नव्हती. तर दुपारपासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत राज्यपाल कोश्यारी यांचे नियोजित कार्यक्रम होते, असे राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे. अशा परिस्थितीत संध्याकाळी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे राजभवनावर दाखल झाले. त्यांनी राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितली. त्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना 1 सप्टेंबरचा वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आता 1 सप्टेंबरला राज्यपालांच्या भेटीसाठी जाणार आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.