आरोग्य

एकनाथराव खडसेंना वाढीव वीज बिलाचा “शाॕक”

मयुरेश निंभोरे

9325250723

दि-07/08/2020 राज्यात एकीकडे टाळेबंदीच्या काळात सर्वसामान्य वीज बिलाचा आकडा पाहून आश्चर्य व्यक्त करत असताना राजकीय नेत्यांनाही याचा फटका बसत असल्याचं दिसत आहे. भाजपा नेते एकनाथ खडसे यांना मुक्ताईनगर येथील घरासाठी १ लाख ४ हजार रुपयांचं बिल पाठवण्यात आलं आहे. एप्रिल ते जुलै अशा चार महिन्यांचं हे बिल आहे. एकनाथ खडसे यांनी वापर कमी असूनही इतकं वीज बिल आल्याने आश्चर्य व्यक्त केलं आहे. राज्य सरकारने याप्रकरणी चौकशी करावी तसंच बिलात सूट दिली गेली पाहिजे अशी मागणीही एकनाथ खडसे यांनी केली आहे.

एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “लॉकडाउनच्या या काळात येणारी वीज बिलं अवास्तव असून ती न भरण्यासारखी आहेत. महावितरणने अशा पद्दतीने लोकांना वेठीस धरु नये”. “सरकारने अवास्तव बिलांची चौकशी केली पाहिजे. तसंच बिलामध्ये सवलत दिली पाहिजे,” अशी मागणी एकनाथ खडसे यांनी यावेळी केली आहे.
दरम्यान लॉकडाननंतर आलेल्या वाढीव वीज बिलात सवलत देण्याचे आदेश आपण देऊ शकत नाही, असं उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केलं. तसंच ग्राहकांनी याप्रकरणी तक्रार निवारण मंचाकडे दाद मागण्याच्या आपल्या निर्देशांचा पुनरूच्चार केला. ग्राहकांच्या तक्रारींवर विलंब न करता तातडीने निर्णय देण्याचं आदेशही मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठाने वीज नियामक मंडळ तसेच वीजपुरवठादार कंपन्यांना दिलेले आहेत.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.