खान्देशजळगावनिवडणूकमुंबईराजकीय

एकनाथराव खडसेंनी घेतली किंगमेकर असलेल्या “या” अपक्ष आमदारांची भेट, विधान परिषद रणसंग्राम

विधान परीषद निवडणूकीचे वातावरण तापले

एकनाथराव खडसेंनी घेतली किंगमेकर असलेल्या “या” अपक्ष आमदारांची भेट, विधान परिषद रणसंग्राम

मुंबई: राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे उमेदवार एकनाथ खडसे हे बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीला पोहोचलेले आहे. कालच भाजप नेते गिरीश महाजन आणि भाजपचे विधान परिषदेचे उमेदवार प्रवीण दरेकर यांनीही बविआचे आमदार हितेंद्र ठाकूरांची भेट घेतली होती त्यासाठी त्यांनी तात्काळ पोहचण्यासाठी लोकल ट्रेनने प्रवास केला होता. त्यानंतर आज खडसेंनी विरार येथे हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. आता विधानपरिषदेत हितेंद्र ठाकूर हे कोणाला मतदान करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

भाजप नेते गिरीष महाजन व प्रवीण दरेकरांचा लोकल प्रवास


राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर आता राज्यात विधान परिषद निवडणूकांसाठी पडद्यामागे आणी समोरही प्रचंड घडामोडी घडत आहेत. उद्या म्हणजेच 20 जूनला राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठीचं मतदान होणार आहे. मतदानाला आता फक्त एक दिवस उरलाय त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपने आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे 10 व्या जागेसाठी मोठी चुरस असणार आहे. यामध्ये बहुजन विकास आघाडीची मतं अत्यंत्त महत्त्वाची ठरणार आहेत. भाजपने एकनाथराव खडसेंच्या पराभवासाठी खास रणनीती आखलेली असून याचा अंदाज खडसे यांना आलेला आहे. निवडून येण्याचा मार्ग सोपा करण्यासाठी आज राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे उमेदवार एकनाथराव खडसे यांनी हितेंद्र ठाकूरांची भेट घेतली.

राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीतही लहान पक्ष मोठी भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे अपक्षांचा भाव वधारला आहे. विधानसभेत बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार आहेत. या तिघांची मतं मिळावीत यासाठी महाविकास आघाडी आणि भाजप दोघांचेही प्रयत्न सुरु आहेत.

हितेंद्र ठाकूर स्वत: आमदार आहेत. तेच या निवडणूकीत किंगमेकर ठरणार आहेत. त्यांचे पुत्र क्षितिज ठाकूर हे देखील विधानसभेचे सदस्य आहेत. मात्र ते सध्या अमेरिकेत आहेत. त्यांनी लवकरात लवकर भारतात परतावं आणि आपल्या बाजूनं मतदान करावं यासाठी भाजप आणि मविआचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी देखील ठाकूर यांची भेट घेतली आहे.

Follow us Mediamail Social👇
Tags
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.