एकनाथराव खडसे उद्या “ईडी” कार्यालयात चौकशीला हजर राहणार ?

मुक्ताईनगर – पुण्यातील भोसरी जमीन प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे ते यांना “ईडी” ने नोटीस पाठवत 23 डिसेंबर रोजी चौकशीसाठी एकनाथराव खडसे यांना कार्यालयात हजर राहण्याचा समन्स मिळाला होता.
28 डिसेंबर रोजी एकनाथ खडसे ईडीच्या चौकशीसाठी मुंबई कडे रवाना झाले होते. मात्र कोरोनाची लागण झाल्याने त्यांना क्वारंटाईन व्हावे लागले होते. त्यामुळे खडसे हे “ईडी” कार्यालयात चौकशीसाठी हजर राहू शकले नव्हते. मात्र आता त्यांचा क्वारंटाईन काळ संपल्याने उद्या एकनाथराव खडसे ईडीच्या मुंबई येथील कार्यालयात चौकशी करीता हजर राहणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे. यासाठी एकनाथराव खडसे मुंबईत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे. पुण्यात भोसरी जमीन खरेदी प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने समन्स बजावले आहे. 30 डिसेंबर 2020 रोजी खडसेंना हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, समन्स मिळाल्यावर खडसे जळगावहून मुंबईला आले, पण त्यांना कोरोना झाल्याने क्वारंटाईन व्हावे लागले होते. आता उद्या क्वारंटाईन पिरिअड संपल्यावर उद्याच खडसे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर होणार का ? याबाबत सस्पेन्स कायम आहे.
भोसरी येथील जमीन व्यवहार प्रकरणामुळे एकनाथराव खडसे यांना 2016 मध्ये आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तर आतापर्यंत याच प्रकरणी चार वेळा त्यांना विविध चौकशीला समोरे जावे लागले आहे.
एकनाथराव खडसे यांची प्रतिक्रिया
दरम्यान भोसरीच्या व्यवहारा प्रकरणी यापूर्वी अनेकदा माझी चौकशी केली आहे. त्यावेळी मी हजर राहिलो आहे. त्यांनी माझ्याकडे जे कागदपत्रं मागितले, ते मी दिले आहेत. याही वेळेस ईडी जे काही कागदपत्रं मागतील त्यांनी मी पूर्ण सहकार्य करेन,” अशी प्रतिक्रिया एकनाथराव खडसे यांनी यापूर्वी पत्रकार परिषदेत दिली होती.